पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक माने एसीबीच्या जाळ्यात!

पंढरपूर (प्रतिनिधी) ः –  तक्रारदार व त्यांचे इतर नातेवाईक यांचेविरुध्द पंढरपूर शहर पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सहकार्य करुन त्रास न देण्यासाठी व दोषारोप पाठवताना मदत करण्यासाठी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मारुती माने यांचेसाठी अलीम बागवान या फळविक्रेत्याला 5 हजाराची लाच स्वीकारताना    अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो, सोलापूर चे अधिकार्‍यांनी आज रंगेहाथ पकडले आहे.

पोलिस उपनिरीक्षक मारुती माने यांनी संबंधीत तक्रारदारांकडे यापुढे त्रास न देता सहकार्य करण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी करुन सदरची लाचेची रक्कम ही पंढरपूर बसस्टॅन्ड येथे फळाचा गाडा असणारा खाजगी इसम अलीम बागवान याचेकडे देण्याचे सांगितले होते. त्यावरुन अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो सोलापूर कार्यालयामार्फत आज दि. 24 जुलै 2016 रोजी लावण्यात आलेल्या लाचेच्या सापळ्यात अलीम बागवान यास तक्रारदार यांचेकडून 5 हजार रुपयेची लाच घेताना पंढरपूर बसस्थानक येथील कोहिनुर फ्रुट स्टॉल येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सदर प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मारुती माने व अलीम मनाजी बागवान (वय30) रा.गजानन महाराज मठामागे, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, पंढरपूर, जि.सोलापूर यांचेविरुध्द पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जर कोणी शासकीय/निमशासकीय/लोकसेवक यांचे पदीय काम करण्यासाठी जर कोणी लाचेची मागणी करीत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाशी प्रत्यक्ष अगर टोल फ्री क्रमांक 1064,  फोन नं. 0217 -2312668 वर संपर्क साधावा असे आवाहन अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो सोलापूर यांचे वतीने करण्यात आले आहे.        

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *