पंढरपूर (प्रतिनिधी)ः- येथील शिवबुध्द युवा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 96 व्या जयंती निमित्त साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
पंढरपूरमधील लहुजी वस्ताद चौक येथे थोर साहित्यीक आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समिती च्या वतीने आण्णाभाऊंची जयंती साजरी करण्यात आलेली होती. या ठिकाणी आण्णाभाऊंच्या प्रतिमेस शिवबुध्द युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे व प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी पुष्पहार अर्पण करुन थोर साहित्यीक आण्णाभाऊ साठे यांना मानवंदना दिली.
यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान चे सहसचिव भोला साठे, शहराध्यक्ष सचिन भोरकडेे, मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नारायण देवकुळे, बाबा ग्रुपचे उत्तमबाबा चव्हाण, सुमीत पवार, राहुल कोतमिरे व सर्व बहुजन समाजबांधव उपस्थित होते.
Posted inPandharpur

