पंढरपूर (प्रतिनिधी)ः- संतपेठ येथील सन्मित्र ग्रुपच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची 96 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मुन्नागीर गोसावी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र ग्रुप गोपाळपूर शाखेचे अध्यक्ष रविराज केसकर हे होते.
प्रमुख उपस्थिती सन्मित्र ग्रुप संस्थापक अध्यक्ष विदुल अधटराव, सिध्दनाथ कोरे, आदम बागवान, उध्दव आसबे, युवराज गोमेवाडीकर, सागर झाडे, वैभव परचंडे, अयुब मुजावर, अमित मोरे, रुतुराज साळुंखे, निखील खडाखडे, स्वप्नील थिटे, चांगदेव खरात, बाळु सास वडकर, दादा बनकर, सुरज गोसावी, दुर्गेश लकेरी, अमित गोसावी, मयुर गोसावी, पांडुरंग जाधव इत्यादी होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश (गोलु) लकेरी, सतीश सासवडकर, अजय दहीवडे, इस्माईल बागवान, ॠतिक बनकर, जयंत (बापु) क्षिरसागर, कुणाल कोरे, करण लकेरी यांनी परिश्रम घेतले.

