पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 7 अ च्या पोटनिवडणुकीत रंजना चंद्रकांत रणदिवे बिनविरोध

पंढरपूर (प्रातिनिधी):- पंढरपूर नगरपरिषदेच्या प्र.क्रं 7 अ चे नगरसेवक चंद्रकांत रणदिवे हे मयत झाल्याने उर्वरित कालावधीसाठी निवडणुक आयोगाने  या प्रभागाची निवडणूक जाहिर केली होती.

सदर प्रभाग क्रं.7अ साठी उमेश भगवान सर्वगोड व रंजना चंद्रकांत रणदिवे यानी नामर्निदेशन पत्र सादर दाखल केले होते परंतु श्री उमेश सर्वगोड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे पत्र मुख्याधिकारी आभिजीत बापट यांच्या कडे सादर केले.

 त्यामुळे या प्रभागाची निवडणुक बिनविरोध होणार असून रंजना चंद्रकांत रणदिवे याना निवडुन आल्याचे निवडणुक आयोगाच्या सूचने नुसार घाोषीत करण्यात येईल. .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *