नागपूर, दि. 6 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी संस्थेद्वारा निर्वाचित नवनियुक्त सहा सदस्यांना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शपथ दिली.
शपथ घेतलेले नवनिर्वाचित सदस्य पुढीलप्रमाणे : 1. श्री. अनिल शिवाजीराव भोसले (पुणे स्थानिक प्राधिकारी संस्था) 2. श्री. अमरनाथ अनंतराव राजूरकर (नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था) 3. श्री. मोहनराव श्रीपती कदम (सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी संस्था) 4. श्री. चंदूभाई विश्रामभाई पटेल (जळगाव स्थानिक प्राधिकारी संस्था) 5. डॉ. परिणय रमेश फुके (भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी संस्था) 6. श्री. तानाजी जयवंत सावंत (यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था)
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा, विधानपरिषदेचे सदस्य, नवनिर्वाचित सदस्यांचे कुटुंबिय आदी उपस्थित होते.



