पालखी तळ, रिंगण ठिकाणांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी तीर्थक्षेत्र आराखड्यातील विकास कामे अंतिम करण्यासाठी दौरा

पंढरपूरदि. 08  : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील मुक्काम आणि रिंगण सोहळा ठिकाणांना विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी आज भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे राजाभाऊ चोपदार, पालखी सोहळा प्रमुख बाळासाहेब आरफळकर, संस्थानचे विश्वस्त योगेश देसाई होते.
श्री श्रेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर पालखी तळ आणि मार्ग विकास आराखड्यातंर्गत पालखी संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील मुक्माच्या आणि रिंगण ठिकाणाची पाहणी आणि विकास कामे अंतिम करण्यासाठी विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी दौरा केला.
विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांचे आज दुपारी 1.00 वाजता नातेपुते येथे पालखी तळावर आगमन झाले तेथे जिल्हाधिकारी रणजितकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे  यांनी नातेपुते येथील पालखी तळाबाबत माहिती दिली. यावेळी श्री राजाभाऊ चोपदार यांनी ही नातेपुते येथील जागा अपुरी पडत असल्याचे चर्चेवेळी सांगितले. यावेळी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.विजय देशमुख, माळशिरसच्या तहसिलदार श्रीमती बी.एस.माने, गटविकास अधिकारी सुरेश मारकड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
श्री.चोक्कलिंगम यांनी त्यानंतर सदाशिवनगर, खडुस फाटा, वेळापूर, भंडीशेगांव, वाखरी येथे भेटी दिल्या या प्रत्येक ठिकाणी पालखी सोहळ्यास असणा-या अडचणी बाबत श्री. राजाभाऊ चोपदार, श्री आरफळकर यांच्याशी चर्चा केली. या समस्यांबाबत विकास कामांच्या माध्यमातून तोडगा काढला जाईल, असे विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी यावेळी सांगितले. त्यांनी बोरगांव, पिराची कुरोली, अकलूज येथील पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणांना भेटी दिल्या.
या दौ-यात सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, पंढरपूरचे तहसिलदार नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.        

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *