पंढरपूर (प्रतिनिधी) आज दि. 26 डिसेंबर 2016 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील शहर पोलिस ठाण्यात शासकीय काम करणार्या पोलिसाला आरोपींच्या बाजूने आलेल्या एकाने गच्चीला धरुन पोलिसाच्या गुप्त भागावर मारहाण केल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी प्रसंगावधानेने तात्काळ यातील आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देत शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की, आज वरील वेळी व ठिकाणी कमलाबाई हरिभाऊ तारे यांनी देविदास दत्तात्रय कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. यावेळी देविदास कांबळे यांच्या बाजूने शहर पोलिस ठाण्यात आलेल्या राजेंद्र दत्तात्रय भिंगे (इसबावी, पंढरपूर) हा तक्रारदार यांचा नादू आदित्य ज्ञानेश्वर तारे यास शिवीगाळ करून हाताने मारहाण करू लागला. यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार काकासाहेब पुरुषोत्तम व्यवहारे व पोना. घाटगे हे त्यास समजावून सांगत असताना या आरोपीने पो.ना. घाटगे यांचे गच्चीला धरुन व शिवीगाळ करत त्यांचे गुप्त भागावर पायाचा गुडघा मारुन जखमी करुन सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद सहाय्यक पोलीस फौजदार काकासाहेब व्यवहारे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार या आरोपीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Posted inCrime

