एमआयटी पुणे च्या वतीने या ज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा- 2017” स्पर्धेचे आयोजन
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिेषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती “राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा- 2017”
पुणे, दि. 14 : विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर येथे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून ‘राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती – राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा-2017’ रविवार, दि. 19 मार्च2017 व सोमवार, दि.20 मार्च 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला प्रोत्साहन राजर्षी देणार्या छत्रपती शाहू महाराज यांच्या बलोपासनेच्या धोरणाला अनुसरुन या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे हे 11 वे वर्ष आहे.
-स्पर्धेचा उद्घाटन समारंभ -
रविवार, दि.19 मार्च 2017 रोजी दुपारी 3.00 वाजता होणार्या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे कामगार, भूकंप पुनर्वसन व कौशल्य विकास मंत्री ना.श्री.संभाजीराव पाटील निलंगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.हिंद केसरी मा.श्री.श्रीपती खंचनाळे, हिंद केसरी मा. श्री. गणपतराव आंदळकर, हिंद केसरी मा.श्री.दिनानाथ सिंग,3 वेळा हिंद केसरी मा.श्री.जगदीश कालीरमण, हिंद केसरी मा. श्री. अमोल बराटे, 3 वेळा महाराष्ट्र केसरी मा.श्री. विजय चौधरी व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर मा. श्री. राहुल आवारे हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेसाठी भारतातील व विशेष करून महाराष्ट्रातील नामवंत मल्लांना निमंत्रित केले असून स्पर्धेेतील विजेत्या मल्लांना महावस्त्र, श्रीफळ, ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा, सुवर्ण/रौप्य/कांस्य पदक, रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. अखिल महाराष्ट्रातील सर्वात श्रेष्ठ अशा कुस्तीगीराला ‘महाराष्ट्र कुस्ती महा-वीर’हा अत्यंत बहुमानाचा किताब, सन्मानपत्र, चांदीची गदा व रोख रु. 51,000/- देण्यात येतील.
तसेच विविध वजन गटातील विजेत्या मल्लांना गटनिहाय रु.25,000/-, रु.20,000/- रु.15,000/-, रु. 10,000, रु.8,000/-रु. 5,000/- अशा भरीव स्वरुपाची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येईल.
राष्ट्रधर्म पूजक, प्रखर देशभक्त वै. दादाराव साधू कराड यांचा लातूर जिल्ह्यातील रामेश्वर (रुई) या खेडयातील एका वारकरी कुटुंबात जन्म झाला. तरुणपणापासून त्यांना जाज्वल्य देशाभिमानाने भारुन टाकले होते. कमावलेले शरीर, ईश्वर व देशनिष्ठा, अपार कष्ट करण्याची तयारी व प्रभावी व्यक्तिमत्व या जोरावर त्यांनी आपल्या खेडयातील जनतेला व विशेषत: तरुणांना परकीय सत्ते विरुद्ध लढा देण्यास प्रोत्साहित केले. केवळ एवढेच नव्हे, तर मजबूत समाज बांधणीसाठी, धर्माधर्मातील, जाती-जातीतील व विशेष करुन रझाकारांच्या काळात हिंदू-मुस्लिम समाजातील भेद दूर करुन एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या पंचक्रोशीतील रयतेला जागृत केले. अशा या लोकविलक्षण विभूतीच्या स्मरणार्थ शरीरसौष्ठव व आरोग्यासाठी प्रेरित करणारी राज्य पातळीवरील महाराष्ट्र कुस्ती महावीर ही नाविन्यपूर्ण स्पर्धा भरविण्यात येतआहे.
योगमहर्षि शतायुषी वै.शेलारमामा यांच्या नावाने विशेष कुस्त्या
त्याचबरोबर थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रीय कीर्तनकार, आरोग्यशास्त्रातील एक महान चमत्कार, योगमहर्षि शतायुषी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरुस्त अशा पंच्चाहत्तर (75) वर्षे वयाच्यापुढील मल्लांसाठी याच दिवशी एक आगळी वेगळी कुस्तीस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना योगमहर्षि वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा स्मृती सुवर्ण /रौप्य/कांस्य गौरवपदक बहाल करण्यात येईल.
वै. विष्णुबुवा जोग यांच्या नावाने विशेष सामने
संत तुकाराम महाराजांची सार्थ गाथा प्रथम लिहिणारे वै. विष्णुबुवा जोग हे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यांचे सर्वोत्तम आचरण करणारी एक अलौकिक थोर विभूती होते. विष्णुबुवा जोग हे पहिलवानही होते. त्यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सदरील कुस्ती स्पर्धे मध्ये काही सामने खेळवले जाणार आहेत.
-पारितोषिक वितरण समारंभ –
सोमवार, दि.20 मार्च 2017 रोजी सायं. 5.00 वा. पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
सर्व आबालवृद्धांना सहभागी होता येण्यासाठी ही स्पर्धा खालील वजन गटात होईल.
वजन गट : 1) 57 किलो 2) 61 किलो 3) 65 किलो 4) 70 किलो 5) 74 किलो 6) 86 किलो 7) खुला गट 86 ते 125 किलो. सर्व मल्लांची वजने शनिवार, दि. 18 मार्च 2017 रोजी सायं.4 ते 8 व रविवार, दि. 19 मार्च 2017 रोजी सकाळी 7 ते 10 पर्यंत घेतली जातील.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्री. विलास कथुरे (मो.नं.9850211404) व प्रा. पी. जी. धनवे (मो.नं.9822626006) यांच्याशी संपर्क साधावा.
वरील स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार घेण्यात येतील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही. यामध्ये जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी येणार्या जिल्हा कुस्तीगीर संघातील मान्य निवडक कुस्तीगीरांच्या जाण्या-येण्याचे एस.टी.भाडे, निवासाची व भोजनाची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात येईल.
अशी माहिती विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी दिलीे.
