विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदम बागवान यांची निवड
विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने साजरा केला जाणार असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या 126 व्या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पंढरीतील सामाजिक कार्यकर्ते आदम बागवान यांची निवड करण्यात आली आहे.प्रतिष्ठाणच्या रविवारी झालेल्या बैठकीत विविध पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.सुदाम गायकवाड हे होते.यावेळी प्रतिष्ठाणच्या सचिवपदी विशाल आर्वे तर कार्याध्यक्षपदी सुरेश नवले यांची निवड करण्यात आली.प्रारंभी शहीद मेजर कुणाल गोसावी व विचारवंत व थोर साहित्यीक डॉ.कृष्णा किरवले यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
याबैठकीत प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विधायक उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली व प्रतिष्ठानच्या जयंती समितीचे उपाध्यक्ष शारदाताई कांबळे,लखन माने,आंबादास वाघमारे यांची तर खजिनदार भाऊसो (बंटी)शिंदे यांची, स्वागताध्यक्ष मेजर महादेव नागटिळक व निमंत्रक वंदना कसबे यांची तर प्रसिध्दीप्रमुखपदी सोहन जैस्वाल यांची निवड करण्यात आली.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डि.राज सर्वगोड,सचिव अनिल ननवरे सर,मा.अध्यक्षा आशाताई बागल,मोहन शिंदे,प्रभाकर गायकवाड,गजानन शिंदे,सोमनाथ झांबरे सर,शिलरतन झेंडे,प्रदिप रणदिवे,धनराज लटके,मनोज भुईटे,सौ.वर्षा कांबळे,सौ.सुरेखा खरात,दि.बा.शेळके गुरुजी,राजेंद्र हरवाळकर,अक्षय आठवले,निलेश जाधव,समाधान सोनवणे,अनिकेत नवगिरे,सचिन जाधव,शंकर नवगिरे,दिलावर पठाण,औदुंबर बेलकर,चंद्रकांत पवार,तुकाराम ढगे,कुंडलीक रोपळकर,संजय ढावरे आदींसह प्रतिष्ठाणचे सदस्य व संघटनेचे पदाधिकारी व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
