सोयाबीन नुकसान भरपाईची चौकशी करणार
- कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर
मुंबई, दि. 5 : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यांतील सोयाबीन नुकसान भरपाईची चौकशी करुन शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य आशिष देशमुख यांनी यासंबधी प्रश्न उपस्थित केला होता. पिवळ्या मोझार्ट रोगामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. यामध्ये सरासरी उत्पन्न कमी असले तरी या प्रकरणाची चौकशी करुन आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे कृषीमंत्री फुंडकर यांनी सांगितले.
०००००
