शासनाच्या निर्णयानेच आमसभा स्थगित
रणजितसिंह शिंदे :
पंढरपूर तालुक्यात सर्वाधीक विकास कामे
पटवर्धन-कुरोली पुर्नवसन गावठाणात कार्यक्रमात बोलताना जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे, दिनकर नाईकनवरे, मोहन आनपट, पोपट चव्हाण आदी.
पटवर्धन-कुरोली : आ. बबनदादा शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांमध्ये आमदार निधीतून सर्वाधिक विकासकामे करीत कोट्यवधी रुपयांच्या योजना मार्गी लावल्या आहेत. तरीही काहीजण आ. शिंदे आमसभेला वेळ देत नसल्याचा कांगावा करुन लोकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेसाठी आमची आमसभा रोजचीच २४ तास सुरु असते, शिवाय शासनाच्याा आदेशानुसारच मागील आमसभा स्थगित होत्या. याची माहिती त्यांनी घ्यावी मगच बोलावे, असे प्रतिपादन जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केले.
पटवर्धन-कुरोली पुनर्वसन गावठाण (ता. पंढरपूर) येथे काळभैरव यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं़ स़ सभापती दिनकर नाईकनवरे होते. यावेळी आ. शिंदे यांच्यावर विठ्ठलचे संचालक समाधान काळे यांनी आमसभेला वेळ देत नसल्याने अनेक विकास कामे खोळंबल्याचा आरोप केला होता. त्याचा समाचार त्यांनी घेतला.
आ. शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, सभामंडप, समाज मंदिर, हायमॉस्ट दिव्ये आदीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. शिवाय येणाºया प्रत्येक नागरीक, शेतकºयांचे काम त्याच दिवशी त्याच ठिकाणी करतो, त्यासाठी आमसभा बोलावी लागत नाही. शिवाय दुरध्वनीवरुन कामे सांगणाºया नागरिकांची कामेही त्याच दिवशी मार्गी लावली आहेत. तरीही आम सभेचा मुद्दा उपस्थित करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून स्थगित असलेल्या आमसभा शासनाच्या निर्णयानुसार स्थगित आहेत. याची माहिती त्यांनी घ्यावी.
पुर्नवसन गावठाणासाठी आमदार निधीतून सभा मंडप, शाळेसाठी संगणक, पाणी पुरवठाच्या योजना, जिल्हा परिषदेच्या निधीतून व शाळेचे वॉल कंपोडसाठी भरीव निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सभापती दिनकर नाईकनवरे, पोपट चव्हाण, श्रमिक मुक्तीदलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, हरीभाऊ खेडेकर, पंडीत तवटे, सिंकदर शेख, भानुदास गायकवाड, नागेश उपासे, धर्मराज काटकर, श्रीधर नाईकनवरे, दादासाहेब साखरे, भगवान तेरवे, लाला चव्हाण आदी उपस्थित होते.
