विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीेने मंगल ओव्हाळ यांना पुरस्कार प्रदान करताना माजी लक्ष्मणराव ढोबळे, डि राज सर्वगोड, प्रभाकर देशमुख, साधना देशमुख, भगीरथ भालके, समाधान काळे.
पंढरपूर : भारताची घटना मुळात चांगली आहे. परंतु चालवणारे नालायक निघाले तर त्याचा दोष घटनेला देता येणार नाही, असे डॉ. बाबासाहेबांनी घटना दान करताना सांगितले असल्याचे माजी. पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.
विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रामध्ये कामगीरी करणाºया मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते. यावेळी अर्बन बॅँकेचे संचालक मुन्नागीर गोसावी, भीमा. स.सा. कारखान्याचे संचालक प्रभाकर देशमुख, मोहळ पंचायत समितीच्या उपसभापती साधना देशमुख, नगराध्यक्षा साधना भोसले, प्रतिष्ठानचे संस्थापक डि.राज सर्वगोड, विठ्ठल स.सा. का. संचालक भगीरथ भालके, समाधान काळे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश यादव, नगरसेविका श्वेता डोंबे, वडार समाज शहराध्यक्ष रामा चौगुले, भारत माळी उपस्थित होते.
पुढे माजी. पालक मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची माहिती देत बहुसंख्येने उपस्थित असलेल्या मन:चक्षू समोर डॉ. आंबेडकरांचा चल चित्रपट उभा केला.
यावेळी प्रतिष्ठानचे सचिव अनिल ननवरे, कार्र्याध्यक्ष राम सर्वगोड, सहसचिव प्रविण माने, जयंती समिती अध्यक्ष आदम बागवान, सचिव विशाल आर्वे, कार्याध्यक्ष सुरेश नवले, शारदा कांबळे, वंदना कसबे, बंटी शिंदे, लखन माने, गजानन शिंदे, रणजीत रणदिवे, रमेश सासवडकर, सोहन जैसवाल, आशा बागल, रेहना अत्तार, रेश्मा सर्वगोड, सुनिता सासवडकर, अंबादास वाघमारे, प्रा. रविराज कांबळे, शिलरतन झेंडे, श्रीकांत कसबे, सुरज पावले, अनिकेत देशपांडे, बंटी वाघ, आनंद सोमासे, विकास वाघमारे, अनंत कुंभारे, दिपक नाईकनवरे, सुहास जाधव, प्रशांत आठवले, तुकाराम ढगे, आकाश फडतरे, रणजीत रणदिवे, सोमनाथ झांबर आदीजणांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुसेन गरड यांनी केले.
यांना मिळाला पुरस्कार
अॅड. चारुशिला गेजगे (प्रबुध्द विधिज्ञ), गणेश अंकुशराव (महर्षी वाल्मीकी शौर्यरत्न), पद्मकुमार गांधी (वर्धमान महावीर अहिंसा रत्न), सिध्दार्थ साळवे, शाहीर कालीदास सोनवणे, देवीदास बंगाळे, (राष्टÑसंत रोहिदास महाराज, प्रबोधनरत्न), ज्ञानप्रकाश घुगे (छत्रपती शिवाजी महाराज प्रशासन रत्न), विनायक शिवशरण, मंगल ओहाळ (राजमाता अहिलादेवी होळकर उद्योगरत्न), अॅड. राजेश भादुले (महात्मा बसवेश्वर समाज भुषण), प्रा. सविता दुधभाते (क्रांती ज्योती सावित्री फुले शिक्षण भुषण), अशोक कोर्टीकर (राष्टÑसंत गाडगे महाराज शिक्षण रत्न), गुरुदोडीया (नारायण मेघाजी लोखंडे कामगार रत्न), डॉ. विजय शहा/ डॉ. गिरीश बोरावके (डॉ. सी. के. बोले वैद्यकीय रत्न), रेखा कोळी/अभिजीत गांजाळे (राजर्षी शाहु महाराज क्रिडा रत्न), बाळासाहेब बडवे ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेष्ठ पत्रकार), डॉ. संजय रणदिवे/अपराजीत सर्वगोड (आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर युवा पत्रकार), अंकुश गाजरे (साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे साहित्य रत्न), दिलीप टोमके/पद्माकर सर्वगोड (महाकवी वामनदादा कर्डक कलारत्न), आबा शिंदे (डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न), अजयकुमार सर्वगोड (भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्वेश्वरय्या स्थापत्यरत्न), डॉ. प्रशांत पवार (भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, विज्ञानरत्न), शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर, नवक्रांती कला, क्रिडा, बहुउद्देशीय मंडळ, कौठाळी, अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर, एस.पी. प्रतिष्ठान सोलापूर (राष्टÑपिता महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार).
विरपिता गोसावी यांना सन्मान पत्र
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुणाल गोसावी यांच्या वीर पिता मुन्नागीर गोसावी यांना प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. या सन्मान पत्राचे वाचन श्रीकांत कसबे यांनी केले.
