पंढरपुर तालुक्यातील पोलीस कोमात, गुंड जोमात…!! लक्ष्मीटाकळीत सहा.पोलिस फौजदाराला मारहाण !

पंढरपुर तालुक्यातील पोलीस कोमात, गुंड जोमात…!!
लक्ष्मीटाकळीत सहा.पोलिस फौजदाराला मारहाण !

पंढरपूर : कायदा व सुव्यस्था राखण्याचे काम करणा-या पोलीसांनाच गुंडाकडुन मारहाण होण्याच्या घटना पंढरपूर शहर व ग्रामीण भागात घडत आहेत. काही दिवसापुर्वी शहर हद्दीत एकाने पोलीसांना मारहाण केली होती. त्याच इसमाला मंगळवारी खूनाच्या आरोपाखाली अटक केले असतानाच, त्याच दिवशी लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथे पुन्हा एका सहा.पोलीस फौजदाराला मारहाण करण्याची घटना मंगळवारी घडली आहे. यामुळे पोलीस कोमात असून गुंड जोमात असल्याचे चित्र पंढरपुरकरांना पाहावयास मिळत आहे. 

सहा. पोलीस फौजदार देवराम जबाजी बोटे (वय४६, नेमणूक ता. पोलीस ठाणे, पंढरपूर)मोटार वाहन कायद्याखाली केसेस करीत असताना सुरज मनोहर जगताप (रा. लक्ष्मी टाकळी, ता.पंढरपूर) याने मोटार सायकलवर येवुन ये बोट्या तुला लिबेंकर यांचे ७६९५ या वाहनावर कारवाई करुन वाहन सस्पेंड करत असे सांगितले. तरी तु माझे का ऐकत नाही, तु मला तुमच्या हद्दीत चालणारे वाहनाचा हप्ता का देत नाही ? मी तुझे उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे साहेबाला मला हप्ता द्या म्हणून अर्ज दिला आहे. असे म्हणाला त्यावेळी मी त्यास कसला हप्ता मागतो असे बोलत असताना सुरज जगताप याने मोटार सायकवरुन खाली उतरुन माझे जवळ शिवीगाळ करीत येवुन माझे डावे गालावर चापट मारली. माझी गच्ची पकडुन माझे हातातील पावती पुस्तक हिसकावुन घेवुन फेकुन दिले. व माझे छातीत पोटात बुक्या मारुन मी करीत असलेले लोकसेवकाचे शासकीय कामात अडधळा निर्माण करुन मला खंडणीची मागणी केली आहे. अशी तक्रार सहा.पो.फौ. देवराम बोटे यांनी दिली आहे. पुढील तपास सहा.पोनि. गायकवाड करीत आहेत.

पंढरपूर शहर व तालुक्यातील पोलीसांचा गुंडगीरीवरचा दरारा कमी झाला असून गुंडाकडूनच पोलीसांच मारहाण होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. पोलीसानांच मारहाण होत आहे. यामुळे सामान्य नागरीक भयभीत झाले आहेत. 

हप्त्याच्या पैशांवरुन वाद

सुरज जगताप याने सहा.पो.फौ. देवराम जबाजी बोटे याने शिवीगाळ केली, गालावर चापट मारली. तसेच गच्ची पकडुन हातातील पावती पुस्तक हिसकावुन घेवुन फेकुन दिले. मला तुमच्या हद्दीत चालणारे वाहनाचा हप्ता दे, नाही तर तूझी तक्रार वरीष्ठ अधिकाºयाकडे करीन असे सांगून वाद केला. परंतु हा हप्ता कोणी कोणाला द्यायचा हा चर्चेचा विषय झाला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *