पंढरपुरला फक्त दहा दिवसचा पाणीसाठा शिल्लक…एक दिवसा आड पाणी पुरवठा; पाणी पातळी कमी

पंढरपुरला फक्त दहा दिवसचा पाणीसाठा शिल्लक…
एक दिवसा आड पाणी पुरवठा; पाणी पातळी कमी..


पंढरपूर : पंढरपूर शहराला पाणी पुरवठा करणा-या भीमा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यातील पाण्याची पातळी कमी झाली असून १० ते १२ दिवस पुरेल इतका पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती पाणी पुरवठा अभियंता अशोक भालेराव यांनी दिली.
भीमा नदीवरील आंबाबाई पटागंण येथील भीमा नदीवरील कोल्हापूर बंधा-याची उंची ३ मीटर आहे. यामध्ये १०६ द.श.ल.घ.फुट पाणी साठविण्याची क्षमता आहे. या बंधाºयातून पंढरपूर शहर, सांगोला शहर, शिरबावी प्रादेक्षिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत ८१ गावांना तसेच कासेगाव आदी ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येतो.  संध्या या बंधाºयात १ मीटर उंचीने पाणी शिल्लक आहे.
पाणीपुरवठा होत असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने शिल्लक पाण्याचा वापर काटकसरीने करुन जास्तीत जास्त दिवस शहरास पाणी पुरवठा करणेकरिता शहरास २० एप्रिल पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णन नगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पाणीसाठा संपल्यानंतर नागरीकांना पाण्यासाठी वनवन करावी लागणार आहे.
यामुळे नगरपालिकेकडून पुरविण्यात येणारे पाणी बांधकाम, गाड्या धुणे, बागकाम  इतरत्र वापरु नये. पंढरपूर शहरातील सर्व नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे अवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.

नदीकडेची विद्यूत कनेक्शन बंद करण्याची गरज

नदी पात्रातील पाण्याचा उपसा शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे पाणीसाठ जलद गतीने कमी होत आहे. पाणीसाठी पाणी शिल्लक राहावे यासाठी तत्काळा बंधा-याच्या बाजूची विद्यूत कनेकश्न बंद करण्याची गरज आहे. अन्यथा नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *