गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर, दि.23:  राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री यांनी  श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सपत्निक दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व श्रींचा फोटो देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक पो‍लिस अधिक्षक निखिल पिंगळे, नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे, उप-कोषागार अधिकारी एन.एस.कुलकर्णी, शहर पोलिस निरिक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *