पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महात्मा बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम प्रकट दिन साजरा

पंढरपूर Live  दि.29 एप्रिल 2017

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त व भगवान परशुराम प्रकट दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास धनंजय बोरगावकर यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्षा सुजाता बडवे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, पाणीपुरवठा समिती सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक करुणा आंबरे, आशिष डोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेविका रेणुका घोडके, अनुसया शिरसट, नगरसेवक विवेक परदेशी, दत्तात्रय कवठेकर, नरसिंह शिंगण, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके, अ‍ॅड.राजेश भादुले, निलेश आंबरे हे उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *