पुणे, दि. 6 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, गोल्फ क्लब, येरवडा, पुणे इमारतीचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि पालकमंत्री गिरिष बापट यांच्या उपस्थितीत रविवार, 7 मे,2017 रोजी आयोजित करण्यात आला होता. सदरहू कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रदद् करण्यात आला आहे. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त समाजकल्याण, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Posted inPolitics


