पंढरपूर येथे टिपु सुल्तान यांचा बलिदान दिन साजरा

पंढरपूर येथे शहीद टिपु सुल्तान यांना आंदराजंली वाहताना डि. राज सर्वगोड, जमीर तांबोळी, उप.पो.नि. संतोष इंगळे, नगरसेवक संजय निबांळकर, हाफीज महम्मद खान.

पंढरपूर : शहीद टिपु सुल्तान यांचा बलीदान दिन शहीद टिपु सुल्तान युवक संघटनेच्या वतीने गुरुवारी साजरी करण्यात आला.
या टिपु सुल्तान यांच्या प्रतिमेचे पुजन उप.पोलीस निरिक्षक संतोष इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डि.राज सर्वगोड होते. यावेळी नगरसेवक संजय निबांळकर, बाजार समितीचे संचालक सिंकदर बागवान, हाफीज महम्मद खान, मौलाना अल्लाउद्दीन, शौयल रज्जाक, अनिल ननवरे, संतोष सर्वगोड, रामेश्वर सातपुते, अर्जुन चव्हाण, विशाल आर्वे, संदिप मुटकुळे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संघटनेचे शहराध्यक्ष जमीर तांबोळी, आदम बागवान, प्रविणकुमार कसबे, समीर मोदी, रफीक आत्तार, वसीम शेख, मुजाहीद्द शेख, अझरुद्दीन संय्यद, करीम मुलाणी, मसुर शेख, सलमान सय्यंद, टिपु तांबोळी, इलिया शेख, इम्राण सय्यद, आस्लम सय्यद, समीर तांबोळी, पापालाल सय्यद, अमीर खरादी, मुस्ताक खरादी यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *