👁 2 Views

तीर्थक्षेत्र विकास आराखडा व महावितरण कंपनीकडून प्रलंबीत कामे तात्काळ पूर्ण करुन घ्या-आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर लाईव्ह वृत्त 10 मे 2017

तीर्थक्षेत्र विकास आराखाडयाअंतर्गत पंढरपूर शहराचे सुशोभिकरणासाठी 2012 सालापासून सुरू असलेली बहुतांशी विकासकामे अपूर्ण व सुमार दर्जाची झालेने नागरिकांमधून तक्रारीचा सुरू ऐकावयास मिळत होता. अशी प्रलंबित कामे तीर्थक्षेत्र विकास आराखडा व महावितरण कंपनीकडून तात्काळ पूर्ण करून घेणेत यावीत अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे आमदार
प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड।सीं;्या अंतर्गत पंढरपूर शहरामध्ये प्रदक्षिणा मार्ग व परिसरात नवीन आकर्षक पध्दतीचे पथदिवे, हायमास्ट।सीं; दिवे बसविणे अशा पध्दतीचे कामाचा समावेश होता. 2012 पासून सदर सुशोभिकरणाचे काम सुरू होते. जिल्हाधिकारी किंवा विभागीय स्तरावरून हे टेंडर दिली गेली होती. सदर विभागामार्फत गेल्या तीन वर्षापासून पंढरपूर शहरामध्ये नवीन दिव्यांचे खांब उभा केले गेलेले आहेत.

ते उभा करीत असताना त्याचे शेजारीच असणारे जुने खांब काढणे गरजेचे होते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले, या कामाची जबाबदारी स्थानिक प्रशासन म्हणून ना नगरपालिकेकडे होती ना महावितरण कंपनीकडे होती. यावर कोणाचेही सक्षम नियंत्रण नव्हते. उभा केलेले खांब व विद्युतकरणाची यंत्रणा विनावापर पडून होती. वरील पथदिवे चालू न केल्यामुळे नगरपालिकेला जुन्या स्ट्रिट; लाईटस् सुध्दा बंद करता येत नव्हत्या. गेल्या वर्षभरामध्ये नगरप्रशासनाने वारंवार जिल्हाप्रशासन विभागाकडे याबाबत पत्रव्यवहार केला. परंतु त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे शहरातील मुख्य
रस्त्यावर या उभा केलेल्या पथदिव्याच्या बाजूने मोठ।सीं;्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. त्याचा त्रास स्थानिक नागरिक व पंढरीत येणार्‍या हजारो वारकर्‍यांना होत आहे.

याबाबत आ.प्रशांत परिचारक यांनी मा.जिल्हाधिकारी यांना पंढरपूरातील वाहतूकीस अडथळा होणारे निरूपयोगी पोल, डीपी (फिडर पिलर), वायर्स यापासून येणारे भाविकांना व नागरिकांना त्रास होवू नये यासाठ।सीं;ी गेल्या तीन-चार वर्षापासून बंद
अवस्थेत असलेले पथदिवे चालू करावेत तसेच जुने खांब काढून टाकणेची कार्यवाही आषाढी यात्रेपुर्वी सुरू करावी आणि जर सदर ठेकेदार, एजन्सी काम करीत नसतील तर त्यांचेवर कडक कार्यवाही करावी अशा पध्दतीची मागणी केली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *