आळंदी-गेल्या महिनाभरापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या रथाची दुरूस्ती ही कात्रज येथील एका वर्कशॉपमध्ये प्रकाश मिस्त्री व रमेश मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, येत्या एक ते दोन दिवसांत तो देवस्थानकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे प्रकाश व रमेश मिस्री यांनी सांगितले.
येत्या 17 जून रोजी माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होतो आहे, सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी प्रामुख्याने रथाचे स्थान महत्वाचे असते, त्यासाठी रथाच्या देखभाल दुरूस्तीसह त्यास झळाळी देणे, ब्रेक, बेरिंग, चाके व इतर अत्यावश्यक अशा सर्वच बाबींची काळजीपूर्वक तपासणी करून मगच रथ पालखीस जुंपण्यात येतो. कारण त्यास आळंदी ते पंढरपुर व पुन्हा आळंदी असा तब्बल 31 दिवसांत एकूण 550 किमी अंतर पार पाडावे लागते. आळंदीहून पालखी पंढरपूरला जाईपर्यंत लाखो भाविक पालखीतिल माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी रथावर चढतात त्यासाठी रथ वापरायोग्यही असणे तितकेच गरजेचे असते. संरक्षण विभागाच्या आर ऍण्ड डी विभागाने दिलेला चांदीचा बॅटरीवर चालणारा अत्याधुनिक रथ सन 2013 ते 2015 पर्यंत वापरण्यात आला; मात्र बॅंटरीवर चालणाऱ्या रथाला बैल समितीकडून विरोध दर्शविला गेल्याने गत वर्षीपासून मागील (जुना) वीस वर्षापुर्वीचाच जुना रथ वापरण्यास सुरूवात केली.
सध्याच्या चांदीच्या रथाची उंची जास्त असल्याने भाविकांना दर्शन घेताना प्रयास करावा लागतो, त्यासाठी रथाची उंची कमी करण्याचा निर्णय देवस्थानने घेऊन रथास यंदा नवीन चाके देखील बसविण्यात आली आहेत. हा रथ हा जर्मन सिल्वरमध्ये बनविण्यात आला आहे. पालखी सोहळ्यानंतर सुमारे11 महिने रथ एकाच जागेवर असल्याने त्यास काळपट रंग आला होता. त्यास बफिंग करून झळाळी देण्यात आल्याचे प्रकाश व रमेश मिस्त्री यांनी सांगितले. यंदा रथावरील गोल शिखरे व दर्शनी भागातील गरूडाची शिल्पे सोनेरी मुलामा देऊन चमकविण्यात आली आहेत. लवकरच वारीसाठी सज्ज केलेल्या रथाची विधिवत पुजा करण्यात येणार आहे. मिस्त्री कुटुंब हे गेली 43 वर्षांपासून माऊलींच्या रथाच्या दुरूस्तीची कामे करत असून, इतर अनेक संतांच्या रथाची कामे देखील हे कुटुंब करीत आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



