👁 7 Views

मराठी भाषिक दिन : श्रीमती काशीबाई नवले एज्युकेशन कमलापूर तालुका सांगोला येथे संपन्न

दि.  27 फेब्रुवारी 2023 वि ,वा ,शिरवाडकर यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज या नावाने मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी अनेक कवितांची देणगी मराठी भाषेला त्यांच्या रूपाने लाभली मराठी भाषेचा गुणगौरव करण्यासाठी आजचा दिन साजरा केला जातो. 


 या निमित्ताने प्रास्ताविक करताना प्राध्यापक गाडेकर सरांनी मराठी भाषेचा गुणगौरव करत महाराष्ट्राच्या प्रगतीत मराठी भाषा समृद्ध आहे, गुणगौरव करता येईल अशी आहे,  याबद्दल मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषेचे स्रोत, मराठी भाषेचा व्यासंग, मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी काय करता येईल याबद्दल  प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.


प्राध्यापक जगताप सर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. त्यावेळी त्यांनी मराठी भाषा कशी अनेक विभागवार बदलते त्यांची बोली, त्यांची शैली कशी बदलते? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठी भाषेचे त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात उलगडून सांगितले.

यावेळी मराठी भाषिक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशिक्षणार्थीच्यावतीने श्रीमती श्लेषा कारंडे यांनी मराठी विभागाचे प्रमुख म्हणून प्राध्यापक माळी सर आणि प्राचार्य पाटील सर यांचा मराठी भाषिक दिनानिमित्त शाल ,फेटा ,गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सत्कार केला.


यावेळी यशवंत मुक्त विद्यापीठाचे प्रशिक्षणार्थी आणि बीएड कॉलेजचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *