👁 16 Views

बीडमधील रेल्वे रुळाच्या 150 चाव्या अज्ञाताने काढल्या!

बीड : राज्यात पुन्हा एकदा रेल्वे रुळांवर घातपाताचा प्रयत्न उघडकीस आला आहे. बीडमधील परळी-हैदराबाद रेल्वे रुळाच्या 125 ते 150 चाव्या अज्ञातांनी काढल्या.  परळी रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर ही घटना उघडकीस आली.
रेल्वे रुळाच्या पॅकिंगसाठी या चाव्या लावलेल्या असतात. त्या काढल्यानं मोठा अनर्थ होऊ शकला असता. मात्र, रेल्वे रुळांवरील सव्वाशे ते दीडशे चाव्या काढलेल्या गँगमनच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या पुन्हा बसवण्यात आल्या. गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात टळला.
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे एवढ्या सगळ्या चाव्या एक व्यक्ती काढू शकत नाही. त्यामुळे यात एकापेक्षा अनेकांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *