नवी दिल्ली- भारतासहीत जगभरातील 100 देशांमध्ये इतिहासातील सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. याची सुरुवात शुक्रवारी झाली. युकेतील राष्ट्रीय आरोग्य सेवेवर सर्वप्रथम हल्ला झाला. यामुळे युकेतील अनेक हॉस्पिटल्स, कॉम्प्युटर्स आणि फोन बंद पडले. त्यानंतर अनेक देशातील हॉस्पिटल्स, सरकारी वेबसाईट्स आणि मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट्सवर हल्ला झाला.
या हल्ल्याला ‘रॅनसमवेअर अटॅक’ म्हटले जात आहे. यामध्ये हॅकर्स प्रथम वेबसाईट हॅक करुन त्यावरील डाटा लॉक करतात आणि तो अनलॉक करण्यासाठी पैशांची मागणी करतात. मात्र भारतात किती कंपन्या आणि सरकारी वेबसाईट्सवर याचा परिणाम झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
हॅकर्सनी केली फक्त 300 डॉलर्सची मागणी
– तब्ब्ल 100 देशातील वेबसाईट हॅक करुन हॅकर्सनी हा डाटा अनलॉक करण्यासाठी केवळ 300 डॉलर्सची मागणी केली आहे.
– त्यांनी असे का केले? हॅकर्सचा उद्देश काय? हा डाटा कोणी हॅक केला? याची माहिती अद्याप समोर आली नाही.
जगभरातील 100 देशांना हॅकर्सनी लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे लॉक केलेला डाटा अनलॉक करण्यासाठी त्यांनी केवळ 300 डॉलर्सची मागणी केली आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





