👁 11 Views

जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टचा महाराष्ट्र सरकारला असाही फायदा..

जस्टिन बिबरच्या लाइव्ह कॉन्सर्टनंतरही बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. १० मे रोजी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टोडियममध्ये जस्टिनने एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची मनं जिंकली. त्यावेळी जवळपास ४५००० जास्त प्रेक्षकांनी या कॉन्सर्टला हजेली लावली होती. ४००० पासून ७५००० रुपये किमतीची तिकीटं खरेदी करुन चाहत्यांनी या कॅनेडियन पॉप स्टारच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. जस्टिनच्या या कॉन्सर्टमुळे महाराष्ट्र सरकारच्या गल्ल्यातही भर पडल्याचं वृत्त आहे. या कॉन्सर्टमधून जमा झालेल्या निधीची आकडेवारी पाहता ३.८ कोटी रुपयांचा मनोरंजन कर सरकारच्या गल्ल्यात जमा झाला असल्याचं म्हटलं जात आहे.
जस्टिनचा हा पहिलाच भारत दौरा होता. त्याच्या येण्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. पाच दिवसांसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या जस्टिनने लाइव्ह कॉन्सर्टनंतर लगेचच परतण्याचा निर्णय घेत हा दौरा अर्ध्यावरच सोडून तो निघून गेला. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या कॉन्सर्टमध्ये त्याने त्याची गाजलेली २१ गाणी गायली. यात ‘बेबी’, ‘व्हेअर आर यू नाऊ’, ‘बॉयफ्रेंड’, ‘लव्ह युवरसेल्फ’, आणि ‘परपज’ अशा गाण्यांचा समावेश होता. पण, कॉन्सर्टनंतर अनेकांनीच जस्टिन फक्त ‘लिप सिंक’ करत होता असं म्हणत नाराजी व्यक्त केली.
जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टसाठी बॉलिवूड कलाकारांनीही गर्दी केली होती. अरबाज खान, मलायका अरोरा, अन्नू मलिक, आलिया भट्ट, अयान मुखर्जी आणि अशा बऱ्याच कलाकारांचा यात समावेश आहे. मुख्य म्हणजे जस्टिनच्या कार्यक्रमाला गेलेली बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर अवघ्या पाच मिनिटांनी या कार्यक्रमातून बाहेर पडले. त्यांच्यामागोमाग अभिनेत्री सोनीली बेंद्रेनेसुद्धा या कॉन्सर्टमधून काढता पाय घेतला.
काही प्रेक्षकांनी जस्टिनच्या कॉन्सर्टनंतर नाराजीचा सूर लगावला. ज्या प्रेक्षकांनी या कॉन्सर्टची डायमंड (२५,२००), गोल्ड (१५,४००), सिल्व्हर (७,७००) रुपयांची तिकिटं घेतली होती, त्यांना या कॉन्सर्टमध्ये अनेक उणिवा वाटल्या. ज्यांनी ४००० रुपयांची तिकिटं विकत घेतली होती त्यांना तर जस्टिन बिबरला नीट पाहताही आले नाही. त्यामुळे इतकी महाग तिकीटं खरेदी करुनही प्रेक्षकांचा हिरमोड झाला हीच बाब आता समोर येत आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *