तूर खरेदीच्या संदर्भात शेतक ऱ्यांबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानासमोर विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांची मुले बेमुदत उपोषणास बसली आहेत. दानवे यांनी या वक्तव्याबद्दल प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करावी व मोबदला सात दिवसांत द्यावा, कर्जमाफी करावी, वीज भारनियमन रद्द करावे, तूर खरेदीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात इत्यादी मागण्या उपोषणकत्र्र्यानी केल्या आहेत.
हनुमंत पवार (उस्मानाबाद), सागर सोळुंके (औरंगाबाद), मानस पगाट (नाशिक), निखिल कदम (परभणी), अक्षय पुराणिक व शरद पवार (औरंगाबाद), मयूर लाटे (माजलगाव), प्रवीण जाधव (शेलू) यांचा समावेश उपोषणकर्त्यांमध्ये आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




