बुलडाणा : जंगलामध्ये असलेल्या वृक्षांची संपूर्ण माहितीसह शासन दरबारी नोंद व्हावी तसेच वृक्षकटाई झाल्यावरही सदर झाड कुठल्या जंगलातील आहे, याची माहिती मिळावी याकरिता वनविभागाच्यावतीने झाडांचे बार कोडींग करण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस वनविभाग अत्याधूनिक होत असून, आधूनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेवून वृक्षसंवर्धनावर भर देण्यात येत आहे. आॅनलाईन पंचनामानंतर आता वृक्षांची बार कोडींग करण्यावर वनविभागाच्यावतीने भर देण्यात येत आहे. राज्यातील विविध अभयारण्य तसेच जंगलांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे वृक्ष आहेत. या वृक्षांची माहिती वनविभाकडे असणे आवश्यक आहे. त्याकरिता वनविभागाने बार कोडींग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जंगलातील प्रत्येक्षक वृक्षाचा जैविक अभ्यस करून त्याची माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यानंतर या वृक्षांचा डीएनए डाटा तयार करण्यात येईल. सदर डाटा वनविभागाकडे साठवून ठेवण्यात येईल. एखाद्या जंगलाचा डाटा तयार केल्यानंतर त्या ठिकाणी बदलून आलेल्या अधिकाऱ्याला या डाटाचा उपयोग होणार असून, जंगलात कोणती झाडे किती आहेत, याची अद्यावत व अचूक माहिती मिळणार आहे. तसेच या डाटाचा अन्य वन विभागात नव्याने रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांनाही फायदा होणार आहे. यासोबतच एखाद्या जंगलातील वृक्षांची कटाई झाली व त्याची तस्करी करण्यात आली. त्यानंतर वनविभागाने लाकूड पकडले तर सदर झाड कोणत्या जंगलातील आहे, हे झाडाच्या खोडावरून समजणार आहे. त्यामुळे चोरट्यांनी माहिती लपविण्याचा प्रयत्न केला तरी ती सहज उघड होवू शकेल व त्या माध्यमातून वृक्षतोड्यांच्या जाळ्यापर्यंत पोहोचता येईल. या बाबींमुळे झाडांवर बार कोडींग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
झाडांची माहिती व्हावी, तसेच झाडांची तस्करी रोखण्याकरिता झाडांना बार कोडिंग करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
– गणेश झोले, वन परिक्षेत्र अधिकारी
वन विभाग बुलडाणा.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




