वसई : गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला जुना वर्सोवा पूल उद्यापासून पुढचे चार दिवस पूर्णपणे बंद असणार आहे. 14 ते 17 मे या 4 दिवसांसाठी पुलावरील वाहतूक बंद असेल.
वर्सोवा पुलाला तडे गेल्याचं काही महिन्यांपूर्वी निदर्शनास आल्यानंतरही सप्टेंबरपासून या पुलावरुन वाहतूक तशीच सुरु होती. पण पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करून केवळ हलक्या वाहनांसाठीच पूल खुला ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहनचालकांना तासनतास वाहतूककोडींला तोंडही द्यावं लागत होतं.
पण आता याच्या दुरुस्तीसाठी 14 ते 17 मे या कालावधीत वर्सोवा पुल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुजरातच्या दिशेनं होणारी वाहतूक घोडबंदरमार्गे वळवण्यात येणार आहे.
वर्सोवा पुल बंद ठेवण्याने ठाण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण काही महिन्यांपर्वी वर्सोवा पुलावरची वाहतूक बंद करण्यात आल्यामुळं ठाण्याच्या दिशेनें जाणाऱ्या रस्त्यांवर चांगलीच कोंडी पाहायला मिळाली होती. त्यामुळे 14 ते 17 मे दरम्यान वर्सोवा पुल पूर्णपणे बंद ठेवल्याने, या मार्गावरील वाहतुकीचा ताण ठाण्यावर पडणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील अमरमहल सिग्नलजवळच्या पुलाचे बोल्ट निघाल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल दुरुस्त करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागले, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. परिणामी, या मार्गावरील वाहतूक गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने चेंबूर परिसरात अनेक ठिकाणी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




