नवी दिल्ली – पाकच्या तुरुंगात असलेले भारतीय कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) उद्या आपला निर्णय सुनावणार आहे. भारताच्या मध्यस्थीनंतर या न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती आणली होती.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांना कथित हेरगिरी आणि देशविरोधी कारवायांप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, भारताने कुलभूषण यांचे इराण येथून अपहरण करण्यात आल्याचा दावा केला आहे. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर ते इराणला व्यापारा निमित्त गेले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, याबाबत बातमी कळताच भारताने वेगाने हालचाली करत पाकिस्तानला सुनावले होते. देशभरातून दबाव वाढत असल्याने भारताने 8 मे रोजी संयुक्त राष्ट्रांकडे याचिका दाखल करून जाधव यांच्यासाठी न्याय मागितला होता. कुलभूषण यांची भेट घेण्यासाठी भारताने पाकिस्तानकडे 16 वेळेस भेट घेण्याची मागणी केली. मात्र, पाकिस्तानने प्रत्येक वेळी भारताची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे हा प्रकार व्हिएना कराराचे थेट उल्लंघन असल्याचा दावा भारताने संयुक्त राष्ट्रांकडे केला. त्यामुळे याची गंभीर दखल घेत युएनने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे सोपवले, त्यानंतर न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. तसेच उद्या याबाबत सुनावणी करणार असल्याचे सांगितले होते. या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान तब्बल 18 वर्षांनंतर आयसीजेमध्ये समोरा-समोर भिडणार आहेत. यापूर्वी 1999 मध्ये भारताने पाकच्या नौदलाचे विमान हाणून पाडले होते. त्या प्रकरणी पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती.
सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार
15 मे रोजी नेदरलॅंडच्या हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (आयसीजे) मुख्यालयात खटल्याची सुनावणी होत आहे. ही सुनावणी संयुक्त राष्ट्र (यूएन) थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून दाखवणार आहे. तसेच आयसीजेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यूएन येथील भारतीय कमिशनने ही माहिती दिली आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





