विरोधकांनी राज्यपालांवर फेकले कागदाचे गोळे
लखनऊ : उत्तरप्रदेशात नव्याने अस्तित्वात आलेल्या योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्याच विधीमंडळ अधिवेनाची सुरूवात वादळी झाली आहे. आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधीपक्षाच्या आमदारांनी त्यांच्यावर कागदाचे गोळे फेकल्याची घटना समोर येत आहे. सभागृह सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच राज्यपालांच्या अभिभाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सर्वपक्षीय आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी वारंवार शांत राहण्याचे आवाहन केले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. योगी आदित्यनाथ यांचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





