👁 11 Views

नाशिकमधील अतिश्रीमंत चोरट्यास अखेर अटक

नाशिक : नाशिकच्या पेठ रस्त्यावर दिमाखात उभी राहिलेली इमारत एका अट्टल सोनसाखळी चोराची आहे. घराच्या वीटेपासून फर्निचरपर्यंत लागलेला एक न एक पैसा चोरीचा आहे. किरण सोनावणेचा चोरीचा प्रवास बघून पोलिसही चक्रावले आहेत.

परवापर्यंत या चोरट्याचे सर्वकाही सुरळीत होते. मात्र चोरी करतेवेळी घडलेल्या अपघाताने किरणचे बिंग फुटले. तीन दिवसांपूर्वी 55 वर्षीय महिला पायी घरी जात होती. त्याचवेळी किरण सोनवणे आणि त्याच्या साथीदाराने पल्सर गाडीवरुन महिलेच्या गळ्यातली 95 हजारांची चेन खेचली. नागरिकांनी दोन्ही चोरट्यांचा पाठलाग केला. त्याच नादात गाडीला अपघात झाल्याने दोघेही गाडी सोडून पसार झाले. पल्सर गाडीच्या नंबरवरुन तपासाची सूत्रे फिरली. गाडी ज्याच्या नावावर होती तो दुचाकीच्या शोरुमधला कर्मचारी निघाला. हाच कर्मचारी नव्या कोऱ्या गाड्या काही तासांसाठी किरण सोनवणेला भाड्यानं द्यायचा. सध्या नाशकात याच लखपती चोराची चर्चा आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *