👁 8 Views

उरुळी कांचन येथून गावठी हातभट्टी वरील 3 लाख रूपयांचा दारूचा साठा जप्त

 

या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना उरुळी कांचन येथे येथे बेकायदेशीररित्या गावठी दारुची विक्री होत असल्याची खबर मिळाली 


त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून 3 लाख 2 हजार 500 रुपयांची 2 हजार 750 लिटर गावठी हातभट्टीची दारू तसेच 2 हजार 150 रोख रुपये 


असा एकूण 3 लाख 4 हजार 650 रुपयांची दारु जप्त केली आहे. आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


हि कारावाई सामाजीक सुरक्षा विभागचे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भरज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अमंलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अमित जमदाडे यांनी केली आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *