👁 6 Views

शौर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

पंढरपूर । प्रतिनिधी,
पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथे शौर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने छत्रपती संभाजी राजे यांची 361 वी जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली, छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन अभिमन्यू वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हणमंत बंगाळे (शौर्य संस्थेचे संस्थापक ) यांनी छत्रपती संभाजी महाराजे यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटनांची माहिती सांगितली की, संभाजी राजे हे संस्कृत पंडित होते त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला होता तसेच १५ व्या वर्षी वेगवेगळ्या भाषेत तीन महान ग्रंथ लिहिले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी दहा हजार सैनिकांचे नेतुत्व केले होते. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संत तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू त पंढरपूर ही पहिली वारी सुरु केली होती आश्या प्रकारे छत्रपती संभाजी राजांच्या इतिहासावर नजर टाकून कार्यक्रमाची सांगता केली. .
यावेळी शौर्य संस्थेच्या सचिव- शीतल बंगाळे, मोहिनी वाघमारे ( आरोग्य सेविका, अजनसोंड ), रुक्मिणी बंगाळे, तनुजा वाघमारे, उत्तम बंगाळे, प्रीतम वाघमारे, कैलास बंगाळे, कमलेश बंगाळे, पंडित बंगाळे, शनी बंगाळे इतरपदाधिकारी व कार्यकर्ती उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *