👁 6 Views

बाळूमामच दर्शन घेऊन येणाऱ्या गाडीला भीषण अपघात मायलेक जागीच ठार, पाच जण जखमी

 

खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर  पारगाव (ता. खंडाळा ) गावच्या हद्दीत उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव आलेल्या कारनं पाठीमागून धडक दिली.


अपघातात मायलेक दोघेजण जागीच ठार झाले, तर पाच जण जखमी झाले.


याबाबत खंडाळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साताराकडून पुणे बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर पारगाव या ठिकाणी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाळूमामाचं दर्शन घेऊन येणारी मारुती कार (क्रमांक एमएच 13 एन 3154) ही ट्रकला (क्रमांक एम एच 43 वाय 4659) पाठीमागून धडकल्यानं अपघात होऊन, त्यामध्ये कारमधील एक महिला व पंधरा वर्षाचा मुलगा असे दोघेजण जागीच ठार झाले व पाच जण जखमी झाले आहेत.


अपघाताची माहिती मिळताच, खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे व खंडाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी मानसी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलं. मृतांमध्ये कांचन चंद्रकांत वनशिवे (वय 30), वीरेंद्र चंद्रकांत वनशिवे (वय 10) रा. वडगाव रासोई (ता. शिरूर, जि. पुणे) यांचा तर जखमींमध्ये कार चालक संकेत भिमाजी चौधरी (वय 22), अनिल मुक्ताराम कुलथे (वय 55), अंजली अनिल कुलथे (वय 50), आराध्या अनिल कुलथे (वय 7) ही सर्व रा. वडगाव रासाई ता. शिरूर जि. पुणे, तसंच स्नेहल पांडुरंग कुलथे (वय 42) रा. अकोला ( ता. जि. अकोला) यांचा समावेश आहे. याबाबत संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *