👁 8 Views

पंढरपूर Live चे संपादक भगवान वानखेडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान..! शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरणाने तावशी येथे सार्व. शंभू -बसव -बुद्ध -टिपू -अहिल्या जन्मोत्सव सोहळा साजरा!

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी येथे ’मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे सलग 11 व्या वर्षीही सार्व. शंभू -बसव -बुद्ध -टिपू -अहिल्या जन्मोउत्सव सोहळा शिवधर्मीयांचा सण म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने संपूर्ण गावात झेंडे, पताका, स्वागत कमानी, फटाके व तोफांची आतषबाजी सुरु होती.दिनांक 13 मे ते 15 मे सलग 3 दिवस चाललेल्या या सार्वजनिक जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध व्याख्याने, विविध क्षेत्रातील 10 मान्यवरांना पुरस्कार वितरण, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना वही व पेन वाटप, स्त्री-भ्रूण हत्या, गड वाचवा, पाणी वाचवा, झाडे लावा संबधी उपक्रम, इतर अनेक समाजोपयोगी व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. तीन दिवस सकाळी व संध्याकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. संभाजी ब्रिगेडने जाहीर केलेला आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार पंढरपूर Live चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांना मान्यवरांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

जन्मोउत्सव सोहळा अध्यक्ष मा. पुरषोत्तम पवार पाटील, पप्पू यादव, तंटामुक्त समिती अध्यक्ष सिद्धेश्‍वर यादव, साधना विद्यालयाचे यादव, रणदिवे (सर), पांडुरंग व्हरगर (गुरुजी), जगताप गुरुजी, दिलीप पावले, धनाजी कोपे, तानाजीराव सरदार, विजयसिंग देशमुख, किरणराज घाडगे (पुणे, वि. अध्यक्ष सं. ब्रिगेड), म. न. से. चे. दिलीप बापू धोत्रे, स्वागतदादा कदम, बंडू अटकळे, डी. राज. सर्वगोड, योगेश ताड संचालक, अनिल ननवरे सर, विजय बंटी वाघ, नागेश झांबरे सर, राजेंद्र आसबे सर, शिवाजी यादव , विट्ठक यादव पो. मास्तर, समाधान दादा आवताडे चेअरमन, गौरीदादा बुरकुल, पांडुरंग आबा आसबे, परमेश्वर आसबे, समाधान जगदाळे, सागर यादव, संभाजी यादव, आण्णासो मासाळ, निवासराव जगदाळे, संजय यादव संपादक, दत्त पाटील संपादक, भारतभाऊ यादव, धनाजीराव यादव, आण्णासो नकाते, अनुसे सर, प्रदीप आसबे पत्रकार, पांडुरंग सूर्यवंशी पत्रकार, भारत रणदिवे, अजित आतार, जमादार आतार, प्रा. बी. पी. रोंगे सर, वसंतनाना देशमुख जि. प. सदस्य , प्रणव परिचालक युवा नेते, रणजित जगताप सो, विक्रम भोसले, सीताराम शिंदे, सारकरराजे यादव चेअरमन, हरिभाऊ यादव मरापूर, बाळासो यादव मारापूर, नितीन जाधव सर, सूरज पावले शिपाई, पोपट सातपुते, समाधान बुराडे यांच्यासह अनेकांनी प्रतिमा पूजन केले.
या सार्व. जन्मोउत्सव निम्मित सामाजिक, राजकीय, शैक्षणकी, पत्रकारिता, कृषी, आदर्श माता व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल पुढील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. मराठा शिवभूषण योगेश यादव ग्रा. पं. सदस्य, मराठा मित्र मा अल्ताबभाई तांबोळी, आदर्श पत्रकारिता (इलेक्ट्रॉनिक मिडीया) भगवान वानखेडे, आदर्श पत्रकार (प्रिंट मिडीया)रामचंद्र सरवदे, शिवराज्य मित्र विठ्ठल कोळी सर, आदर्श शिक्षक (माध्यमीक) रावसाहेब जाधव सर, गुणवंत शिक्षक धनाजी जाधव गुरुजी, आदर्श समाजसेवक विनोद शिंदे, कृषिभूषण पुरस्कार राजाराम क्षीरसागर, आदर्श वैदयकीय सेवा पुरस्कार डॉ रवींद्र गायकवाड आदी मान्यवरांना तीन दिवसाच्या कालावधीत विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, फेटा, शाल, हार, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल यादव, प्रास्ताविक सं. ब्रि. चे सोलापूर जिल्हा संघटक शिवश्री प्रमोदराजे जगदाळे, आभार प्रदर्शन शाखाअध्यक्ष अमोल कुंभार, उपस्थितांचे सत्कार पं. स. गणप्रमुख धनसिंह यादव, संघटक सिद्धेश्वर यादव, फिरोज तांबोळी, गणेश बुराडे, शाहिद आतार, शकील आतार, कल्याण जगदाळे, महेश पावले, सोहेल आतार, शहानुर गवळी, अक्षय आसबे, आकाश जगदाळे, पवन बुरकुल, दादा गाडेकर आदींनी केले,

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड, सन्मान प्रतिष्ठान, छ. शिवराय मुस्लिम ब्रिगेड, प्रमोदराजे जगदाळे मित्रपरिवार, सं. ब्रि. चे कार्याध्यक्ष राहुनाथ यादव, उपाध्यक्ष दत्ता आसबे, यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमात तावशी पंचक्रोशीतील समस्त विध्यार्थी व तरुण कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *