👁 8 Views

पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे एकास कुटूंबासह मारहाण.. गावातील अनेकांवर अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल..

पंढरपूर लाईव्ह वृत्त दि.19 मे 2017

पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील एकास त्याच्या कुटूंबासह सर्वांना जातीवाचक शिवीगाळ करुन
मारहाण केल्याप्रकरणी गावातील अनेकांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाणेत अनु.जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की, अजिंक्य सत्यवान चंदनशिवे वय 23 वर्ष धंदा मजुरी, रा.खर्डी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणेत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी 1) महेश रोंगे 2) समाधान वाकडे 3) पप्पु रोंगे 4) गणेश रोंगे 5) पांडुरंग रोंगे 6) दत्ता रोंगे 7) विकास रोंगे 8) सचिन रोंगे 9) रणजित जाधव 10) अनिल रोंगे 11) अभिजीत रोंगे 12) दिपक रोंगे पाटील 13) श्रीकांत रोंगे 14) बाबुराव रोंगे वगैरे ओळखीचे व ईतर अनोळखी 30 ते 40 सर्व रा.खर्डी ता पंढरपुर यांनी दि.19/05/2017 रोजी 08/00 वा.सुमारास महेश रोंगे यांचे मोबाईल दुकानासमोर व 10/30 वा.सुमारास फिर्यादीचे घरी खर्डी ता पंढरपुर येथे फिर्यादीस मारहाण केली.

दि.19/04/2017 सकाळी 8/00 वाजणेचे सुमारास यातील फिर्यादी हा मोबाईलला रिचार्ज करण्यासाठी महेश रोंगे याचे मोबाईल शाँपीचे दुकानी गेलो असता तेथे दिपक रोंगे यांनी फिर्यादीस धक्का देवुन चापट मारली होती त्या कारणावरून फिर्यादी व फिर्यादीचे समाजातील 1) सज्जन शेळके 2) चिक्या चंदनशिवे, 3) विशाल चंदनशिवे 4) किसना चंदनशिवे , 5) भाउ गणेश चंदनशिवे असे लोक मिळुन मला केले मारहाणीबाबत महेश रोंगे यांना विचारणा करण्यास सकाळी 9/00 वाजणेचे सुमारास गेलो असता फिर्यादीचे गावातील मराठी समाजातील 1) महेश रोंगे 2) समाधान वाकडे 3) पप्पु रोंगे 4) गणेश रोंगे 5) पांडुरंग रोंगे 6) दत्ता रोंगे 7) विकास रोंगे वगैरे ओळखीचे व ईतर अनोळखी 30 ते 40 लोकांनी मला हाताने लाथाबुक्याने मारहाण केलेली होती त्या घटनेची तक्रार देणेसाठी फिर्यादी पोलीस स्टेशनला आलेवर 1) सचिन रोंगे 2) रणजित जाधव 3) अनिल रोंगे 4) अभिजीत रोंगे 5) दिपक रोंगे पाटील 6) महेश रोंगे पाटील 7) विकास रोंगे पाटील 8) समाधान वाकडे 9) श्रीकांत रोंगे 10) बाबुराव रोंगे आणि ईतर गर्दी होती. लोकांनी सकाळी 10/30 वाजणेचे सुमारास फिर्यादीची आईवडील, भाउ अविनाश यांनाही जातीवाचक बोलून शिवीगाळी करून लाथाबुक्याने व काठीने मारहाण केली. अशी फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाणेत दाखल केली आहे.

त्यानुसार वरील आरोपींवर भादंवि 143,147,149,323,504,427 अनु.जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधास दुरूस्ती विधेयक 2014 चे कलम 3(1)(4),3(2)(तA) ना.ह.सं.7(1)(ड) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहा.पोलीस अधिक्षक निखील पिंगळे हे करीत आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *