👁 8 Views

सांगोल्यातील शिक्षण संस्थेच्या प्राचार्याची गोपाळपूरच्या स्वेरी इंजिनिअरींग मध्ये आत्महत्या! स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन संपवली जीवनयात्रा…

सांगोल्यातील शिक्षण संस्थेच्या प्राचार्याची गोपाळपूरच्या स्वेरी इंजिनिअरींग मध्ये आत्महत्या!
स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन संपवली जीवनयात्रा…

पंढरपूर लाईव्ह २१ मे २०१७

न्यु इंग्लिश स्कुल सांगोला चे प्राचार्य दिलीप जोतीराम खडतरे यांनी आज गोपाळपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

कालच या प्राचार्यांवर सांगोला पोलीस ठाणेत त्यांच्याच शाळेतील एका विद्यार्थिनीची छेडछाड केल्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हापासून ते फरार होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अशी माहिती मिळते. आज त्यांनी स्वेरीत केलेल्या आत्महत्येचे गुढ मात्र कायम आहे. त्यांनी आत्महत्येपुर्वी सुसाईड नोटही लिहील्याची माहिती पुढे येत आहे. परंतु यातील मजकुरासंदर्भात माहिती अद्याप मिळु शकली नाही. पंढरपूर तालुका पोलीस ठाणेत या घटनेची नोंद झाली असून उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन सुरू आहे.

सुसाईड नोटस संदर्भात माहिती हाती येताच
थोड्याच वेळात या संदर्भात सविस्तर बातमी पंढरपूर Live वर प्रसिद्ध करणार आहोत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *