👁 10 Views

मुलीच्या लग्नासाठी घाई करणाऱ्या पत्नीचा कुऱ्हाडीने खून

सोलापूर : मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या लग्नासाठी घाई करणाऱ्या पत्नीचा कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून केल्याप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडूर येथे ही घटना घडली. नागव्वा नागनाथ चिकळ्ळी (वय ४६) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. नागव्वा ही आपली मुलगी पल्लवी हिचा विवाह उरकून टाकावा म्हणून घरात सातत्याने आग्रह धरत होती. परंतु मुलगी अल्पवयीन असून तिचे वय अठरा वर्षांचे झाल्यानंतर तिचा विवाह करू, असे पती नागनाथ चिकळ्ळी हा समजुतीच्या सुरात सांगत होता.

पतीने समजूत काढण्याचा प्रयत्न करूनदेखील पत्नी नागव्वा हिचा मुलीचा विवाह करण्याबाबतचा हट्ट कायम होता. याच कारणावरून ती घरात नेहमीच भांडण काढत असे. त्यामुळे शेवटी संतापलेल्या पतीने-नागनाथ याने तिचा खून करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. घरात नेहमीप्रमाणे पत्नी नागव्वा ही भांडण करून रात्री उशिरा झोपी गेली असता नागनाथ याने तिच्या डोक्यात कुऱ्हाडीचे पाच-सहा घाव घातले. यात गंभीर जखमी होऊन ती जागीच मरण पावली. तिची थोरली मुलगी सविता बसवराज धनुरे (रा. नागुरे, ता. अक्कलकोट) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार वळसंग पोलीस ठाण्यात नागनाथ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *