👁 9 Views

अहमदनगरमध्ये कांदा व्यापाऱ्याकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त

अहमदनगर : नोटाबंदीपासून ते आजपर्यंत जुन्या नोटा जप्त करण्याचे सत्र काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण आता अशाच जुन्या नोटा पुन्हा एकदा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अहमदनगरमध्येही एका कांदा व्यापाऱ्याच्या घरातून तब्बल 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. व्यापारी संजय शेलारला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
नोटाबंदीनंतर शहरातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे. शेलार नगर शहरातील सावेडीत संत नामदेव नगरमध्ये राहतात.

शेलारकडे जुन्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी रविवारी शेलारच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी एका बॅगेत पाचशे आणि हजाराच्या 98 लाख 98 हजारांच्या जुन्या नोटा आढळल्या. त्यामध्ये हजाराच्या साठ लाख 26 हजार, पाचशेच्या 39 लाख 72 हजार नोटा सापडल्या. ही रक्कम मोजण्यास तब्बल चार तास लागले. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *