21 मे : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत चव्हाण यांच्या भाषेची पातळी घसरली. त्यांनी भाषण करताना दानवे यांचा ‘साले’ असा उल्लेख केला आहे.
काही दिवसांपूर्वी दानवेंनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. त्याच वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी टीका करताना अशोक चव्हाण यांनीही भाषेची मर्यादा ओलांडली. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
24 तारखेला होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण मालेगावमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ऊर्दू भाषेतून भाषण करत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे ‘सरकार’ नसून ‘सावकार’ आहेत. हे सरकरा गरीबांना लुटण्याचं काम करत आहे, अशा शब्दात अशोक चव्हाणांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





