पंढरपूर तालुक्यातील आनवली येथील ज्योतिबा मंदिर ते घोडके व गांजाळे वस्ती रस्त्याचे भूमिपूजन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या रस्ते वीज पाणी शैक्षणिक सुख सोयी आरोग्य आदी बाबी साठी भरघोस असा निधी आणून आपल्या मतदारसंघातील जनतेच्या विकास कामासाठी कुठेही कमी न पडता काम करत आहेत.
आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावच्या विकासासाठी वचनबद्ध आहोत, असे आवाहन यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे
सभापती सोमनाथ आवताडे यांनी केले.
या कार्यक्रमात ग्रामस्थांनी आमदार आवताडे यांनी मतदारसंघात विविध विकासकामाच्या रूपाने आणलेल्या निधी बद्दल समाधान व्यक्त केले.
हा समारंभ पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह दादा देशमुख, तुकाराम आबा कुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सरपंच मिस्टर गजेंद्र शिंदे, सिद्धनाथ भोसले चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, ग्रामपंचायत सदस्य वल्लभ घोडके, अनिल डिसले , अविनाश मोरे साहेब, माजी उपसरपंच महादेव सूर्यवंशी, रावसाहेब घोडके, चेअरमन तानाजी शिंदे, उद्योजक संजय पाटील , पोलीस पाटील तोफीक शेख, दीपक पाटील, कृष्णा घोडके, इंजिनियर राहुल शिंदे, लखन सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, भिवा भोसले, बापू सूर्यवंशी, पत्रकार आमीन शेख, रुबाब शेख, चंद्रकांत डिसले, समीर शेख, आसिफ शेख, मज्जिद मुलानी अनिस शेख, इमरान शेख, हुसेन शेख,
अलीम शेख, दादासो नारायण भोसले, अनिल गांजाळे आधी उपस्थित होते.
______________________
“” अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु अलीकडच्या आधुनिक काळामध्ये वाढता संपर्क व दळणवळणाच्या सुविधा या बाबी लक्षात घेता सुव्यवस्थित व दर्जेदार रस्ते बांधणी ही काळाची गरज बनली आहे. मतदार संघातील जनतेच्या या भौतिक सुविधांचा विचार करून आमदार समाधान आवताडे हे नेहमीच सहकार्य कौशल्याने आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत असतात. आमदार अवताडे यांची ही विकासदृष्टी पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघाचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थी यांना नियोजन जागी पोहोचण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



