👁 14 Views

मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त

भिवंड : भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी उद्या (24 मे) मतदान होणार असताना आज एका खाजगी गाडीतून तब्बल 60 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड ठाण्यातून भिवंडीत नेली जात होती.

भिवंडी बायपासजवळील साईबाबा नाका चेकपोस्ट इथे पोलिस आणि महापालिकेच्या आचारसंहिता पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

महापालिका निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना मतदारांना विविध प्रकारची प्रलोभनं दाखवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आणि निवडणूक आचारसंहिता पथकांनी देखरेख अधिक कडक केली आहे.

त्यातच साईबाबा नका चेकपोस्टवर गाड्यांची तपासणी सुरु असताना एमएच 04 ईटी 1508 क्रमांकाच्या एका पांढऱ्या तवेरा गाडीतून तब्बल ६० लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली. ही रोकड महाराष्ट्र ग्रामीण बँकेची असल्याचा दावा करण्यात आला. मात्र गाडीत असलेल्या इसामांपैकी कुणाकडेही याबाबतची पुरेशी कागदपत्रं आढळली नाहीत.

त्यामुळे या सर्वांना शांतीनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आलं असून रोकडही जप्त करण्यात आली आहे. ही रोकड नेमकी कुणाची आहे आणि कशासाठी आणली जात होती, याचा सध्या तपास सुरु आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *