👁 11 Views

लिव ईन रिलेशनशीप-भाग एक…उम्या

Good morning sir.
good morning कसे आहात तुम्ही …
मजेत आहे सर…
सर हि तुमची केबीन …सर चहा की कॉफी ….
नको मी येतायेता घेतलेय ….नाव कस तुमच .,,,.
नारायण कांबळे सर …
मी काका म्हणेन तुम्हाला ….चालेल ना ….
हो सर नारु पण म्हणतात लोक ….ते चालत …काका का नाही चालणार ….
नारु ????? अस का करतात लोक बापाच्या वयाचा माणुस पण कळत नाही भडव्याना …शिपाई असला म्हणुन काय झाले …,.
अॉफिसचा पहिला दिवस ….
प्रमोशन मिळाल आणि शहरातुन उचलुन डायरेक्ट मुंबई …
लोकांकरता स्वप्नसुंदरी पण माझ्यासाठी गर्दी …कोंदट ….रस्त्यावर वहाणार काळसर पाणि … ट्रेन त्यातली गर्दी …घामाचा वास ….कसे काढायचे दिवस ….
मित्राच्या ओळखीन अॉफिसच्या जवळच फ्लॅट मिळाला …
चालत जायच ..किती वेळ ..अर्धा तास ….
विशेष नाही …
गावाकडे सगळे सेटल केलय ..,,बहिणीच लग्न झालय …
शेती आहे बाबा संभाळतात सगळ ….आई नाही …
वय चाळीशीत पोहोचलय ….लग्नच केल नाही …तर जबाबदारी कुठली ????
लग्न का नाही केल ….जबाबदाऱ्या पार पाडताना … विसरलो बहुतेक ….,
नाही तस काही नाही …..लग्न करावसच वाटल नाही कधी ….ऐकलकोंडा पडत गेलो …कमी बोलतो …मिसळत नाही कुणाशी …कुणी घरी बोलवल तर सरळ नाही ..
जिव गुदमरतो ..घोळक्यात ….
शरीराची भुकदेखील विकत घ्यावी वाटत नाही …,,
साला विचित्र वाटत असेन का लोकांना मी ???
गेले उडत मी नाही विचारत ..पण असा कसा माणुसघाणी बनत गेलो मी …..
सर…..सर …..
अं ….येस ….
सर मी लीना ..सिनिअर अकाउंटट ….
आय सी …
बसा ….
थ्यांक्स ….
सर सेटल झालात ना ….काही त्रास ….
नाही ..ऐक मित्र आहे त्याच्या मदतीन झाल ..
जेवणाच वगैरे …..
सध्यातर हॉटेल बघुया मग मेस ….
सर ईथे दोन बिल्डिंग सोडुन आहे ऐक मेस .ख्रिश्चन बाई आहे तुम्हाला चालत असेल तर बघा ….
छान आहे जाधव साहेबांचा डबा तिकडुनच यायचा …
जाधव साहेब ????
हो तुमच्या अगोदरचे ….
सर तुमच्या मिसेस ????
नाही …माझ लग्न नाही झाल …
अजुन ???
काय बाई आहे हिला काय करायचय …माझ लग्न झाल नाही ते …अजुन ……पटकन टाळक्यात बसली बाई …
तुमच्या घरी …,
मी आणी …अंश ….
अंश ??????
हो माझा मुलगा ….
आणि मिस्टर ….
नाही ते हयात नाहित ..अंश दोन वर्षांचा होता ..अपघातात …,आता अंश दहा वर्षांचा आहे ….येते मी सर काही लागल तर सांगा …
डोळे पाणावुन बाई उठुन गेल्या …,
चुकल का माझ ??? उगाच विचारल का ?
साला मी पण अडाणीच …..मग तीन माझ्या लग्नाच विचारल ते …
उम्या

क्रमशः…..

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *