👁 11 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 8

 एक्यूयोगा क्रमशः

जे एकदा गेले कि परत येते नाही ते तारुण्य जे एकदा आले कि परत जात नाही ते वार्धक्य 


सौदर्य हे जसे देहाचे जाते तसेच मनाचे, वृत्तीचे,कृतीचे, व्याप्तीचे, दीप्तीचे, तृप्तीचे, विचारांचेही असते.



२५) पोठावर नाभीच्या भोती नाभीपासून सुरवात करून बाहेरील बाजूस घडाळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने मसाज करावा. नाभीच्या वर उजवीकडून डावीकडे, डावीकडून वरून खाली आणि नाभीच्याखाली डावीकडून उजवीकडे, नाभीच्या खाली उजवीकडून खालून वर मसाज करावं, उताणे झोपून गुढघे मुडपून बाहेर सोडून हि क्रिया करावी.

  यामुळे पोटावरील कन्सेप्शन चॅनेल, स्टमक, स्प्लिन, लिव्हर, गाल ब्लॅडर बिदूवर चांगला परिणाम होतो. याचा फायदा म्हणजे पोटातील लहान आणि मोठे आतडे जठराकडून गुदाकडे घडाळ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेनं गेले आहे. त्यामुळे याचा मुख्य फायदा मलावरोध किंवा बौद्धकोष्टता यासाठी आहे. तसेच लाट्ट्पणा जलोदर, मधुमेह, भूक मंदावणे, किडनी, मूत्राशय, पाळीच्या तक्रारी, स्त्रीरोग इ. साथीने आहे.

टीप : गरोदर स्त्रीने हा प्रयोग करू नये.

२६) दोन्ही हातची बोटे एकमेकांत अडकवून प्रत्येक बोटाच्या खाचेत दाब येईल असे घट्ट धरावे. हाताच्या बोटाच्या खाचेत एक्सट्रा-२८ हे बिंदू आहेत.
  या क्रियेमुळे मनावरील ताण कमी होतो. बोटाना मुग्या येणे, डोके दुखणे, बोटे बधिर होणे इ. वर लाभ होतो.

 डॉ. साखरे एम.एस. 
M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R 
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58, 
पार्क स्टेडियम, 
सोलापूर. 
मो.९८९०१९५०५९

एक्यूयोगा क्रमशः


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *