👁 7 Views

महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप : मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप : मुख्यमंत्री

लातूर : निलंग्याहून मुंबईला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळून अपघात झालाय. परंतु, सुदैवानं हेलिपॅडवरच हे हेलिकॉप्टर कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळलीय.

या अपघातात मुख्यमंत्र्यांच्या हाताला थोडं खरचलं असलं तरी ते सुखरुप आहेत. याच अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी   महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत आपण सुखरूप असल्याचं सांगितलंय. 

‘निलंग्यावरून आमचं हेलिकॉप्टर उडालं… परंतु, तेव्हाच या विमानाला अपघात झाला… परंतु, मी आणि माझी टीम सुखरुप आहे’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनतेला दिलासा दिलाय. 
‘महाराष्ट्राच्या ११ कोटी २० लाख लोकांच्या आशिर्वादानं जनतेचा आशिर्वाद पाठिशी आहे… आई भवानी आणि विठ्ठलाचा हात पाठिशी जनतेनं कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये… महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुखरुप आहे… आपला आशिर्वाद असाच पाठिशी असू द्यावा…  कुणीही काळजी करण्याचं कारण नाही… आपल्या माध्यमातून मी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय…’ असं मुख्यमंत्र्यांनी  बोलताना म्हटलंय. 
याशिवाय ‘अपघातग्रस्त हेलिकॉप्टर जुनं नव्हतं… तर ते नवीन हेलिकॉप्टर होतं… आमचे मीडिया अॅडव्हायजर केतन पाठक यांना थोडं लागलंय… पण, तेही आता सुखरुप आहेत… आपले पुढचे सगळे कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच होतील’ असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. 
“ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर दिली.
लातूरच्या निलंग्याहून मुंबईला परत येत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दुपारी 12 च्या सुमारास उड्डाण घेतलं. पण वाऱ्याचा दाब कमी असल्याचं लक्षात आल्याने वैमानिकाने लॅण्डिंग करण्याचं ठरवलं. पण यादरम्यान, हेलिकॉप्टरचा पंखा वीजेच्या खांबांच्या तारांमध्ये अडकला. यामुळे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाल
हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण?
सुदैवाने यावेळी वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोठी दुर्घटना टळली. दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाठक, प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि दोन क्रू मेंबर हेलिकॉप्टरमध्ये होते. हे सर्व जण सुखरुप आहेत.
वेंद्रजी रिलॅक्स होते. जेमतेम मिनिटभर बोलणं : अमृता फडणवीस
मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, सर्वजण सुखरुप आहेत.
बोलणं झालं तेव्हा देवेंद्रजी रिलॅक्स होते. जेमतेम मिनिटभर संभाषण झालं.
देवेंद्रजी तूर्तास संभाजी निलंगेकरांकडे थांबले आहेत, तिथून दौरा पुढे करतील,
अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली
मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं?
मुख्यमंत्र्यांनी उड्डाण केलेलं हेलिकॉप्टर हे सिरकॉस्की (sirkowski) व्हीटी या प्रकाराचं आहे. जगभरातील व्हीव्हीआयपींना हे हेलिकॉप्टर वापरलं जातं. देशात उपलब्ध असलेल्या हेलिकॉप्टरपैकी हे सर्वोत्कृष्ट आहे.
हे हेलिकॉप्टर जेमतेम तीन ते चार वर्ष जुनं आहे. या हेलिकॉप्टरने एकावेळी अडीच तासांचा म्हणजे साधारणपणे 800 किलोमीटरचा प्रवास करता येतो. दोन पायलट आणि पाच प्रवासी वाहून नेण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कुशल पायलट
महाराष्ट्र सरकारचे अनुभवी क्रू हेलिकॉप्टर उडवतात. टेक्निकल इमर्जन्सी हँडल करण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलेलं असतं. किमान तीन हजार तास उड्डाणाचा अनुभव असलेले पायलट यासाठी नियुक्त केले जातात. कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना अशी हेलिकॉप्टर आणि पायलट दिले जातात.
नागरी हवाई उड्डाण संचालनालयची माहिती
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरने दुपारी 12 वाजता उड्डाण केलं. पण वाऱ्याचा बदलता दाब लक्षात आल्याने वैमानिकाने लॅण्डिंग करण्याचं ठरवलं. या दरम्यान, हेलिकॉप्टर वीजेच्या तारांमध्ये अडकलं. यामुळे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. चॉपरमधील सर्व सहा जण सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहिती नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने दिली.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *