👁 11 Views

राज्यपालांनी केली मुख्यमंत्री फडणवीस यांची फोनवरुन विचारपूस

चेन्नई, दि. 25 –  निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताप्रकरणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चेन्नई येथून मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली.  
”हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत ऐकून तसेच घटनेची दृश्यं पाहून आपणास धक्का बसला. परंतु आपणासह सर्व अधिकारी, पायलट व इतर कर्मचारी सुखरूप आहेत हे समजून समाधान वाटले”, असे मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधताना राज्यपाल म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधून त्यांची विचारपूस केली.  
निलंग्याहून मुंबईकडे येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासहीत हेलिकॉप्टरमध्ये असलेले पाचही जण सुरक्षित आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाण भरताच हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरक्षित आहेत.
”मी आणि माझी टीम संपूर्णतः सुरक्षित आहे. कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही”, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
”माझ्या पाठिशी महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद. काही काळजीचं कारण नाही, मी सुखरुप आहे”, अशी प्रतिक्रियादेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.  
दरम्यान, हेलिकॉप्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरी नेण्यात आले.  
मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावरुन मुंबईच्या दिशेने उड्डाण भरत असताना अचानक कोसळलं. सकाळी 11.58 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात सर्वजण सुरक्षित असून पायलट किरकोळ जखमी झाला आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारीपासून लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. निलंगा येथे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरी मुक्काम होता. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर दौरा
सकाळी 7.30 वाजता 
हलगरा गावात श्रमदानासाठी दाखल 
श्रमदानानंतर औराद शहाजानी, हंगरगा, अनसरवाडा गावांना दिली भेट
गावांना भेट दिल्यानंतर स्थानिकांसोबत साधला संवाद
सकाळी 11.45 वाजता
मुंबईकडे रवाना होण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले
सकाळी 11.58 वाजता
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरनं भरलं उड्डाण
50 ते 60 फूट उंचीवर गेल्यानंतर  हेलिकॉप्टर कोसळलं

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *