पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जे.सी.बी. चे साहायाने वाळु उत्खनन करून ट्रॅक्टर व टीपर चे साहायाने चोरून वाहतुक चालु असलेची गोपनीय माहिती मिळालेली होती. त्यानुसार पंढरपूर तालुका पोलिसांनी भिमा नदीपात्रात जाऊन वाहने पलीकडे थोडया अंतरावर थांबवुन तेथुन कारवाई साठी तीन टीम तयार करून भिमा नदीचे पात्रामध्ये असलेल्या चिलारीच्या झाडामधुन लपत छपत जाऊन कारवाई केली.
पोकाॅ/208 राउत, सोबत पोलीस निरीक्षक के.के.खराडे, पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस.गायकवाड, पोहेकाॅ/1024 पी.टी.ढवळे, पोहेकाॅ/1206 बी.एस.साळंुके,पोहेकाॅ/1076 यु.के. शेंडगे,चापोना/1497 देडे,पोना/459 एम.एम.देवकते, पोना/1540 जी.बी.शिंदे ,पोना/518 डी.बी.सुळ, पोकाॅ/1736 एस.डी इंगळे, पोकाॅ/894 एस.एम.तांबिले, पोकाॅ/427 व्ही.एस.शिंदे यांचेसह पोलीस निरीक्षक खराडे यांनी पिराची कुरोली गावचे शिवारात भिमा नदीचे पात्रात बेकायदेशीररित्या चालु असलेल्या वाळु उत्खनणाचे ठिकाणी छापा मारून कारवाई केली. व वाळु व विविध वाहनांसह एकुण ३६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
भिमा नदीचे पात्रात जेसीबी चे साहायाने वाळु उत्खनन चालु होते. तीन ट्रॅक्टर मध्ये वाळु भरलेली होती तसेच एक टिपर वाळु भरणेसाठी थांबलेला होता. पोलिसांना पाहताच जेसीबीचा चालक जेसीबी जागेवरच व ट्रॅक्टर,जीप,टिपर,मोटार सायकली जागीच सोडुन चिलारीचे झाडातुन पळु लागले त्यावेळी पोलीस स्टाफने पळुन पाठलाग करून त्यापैकी त्यातील शिवाजी आप्पासाहेब खाटमोडे वय 21 रा.माळेवाडी जांबुड ता.माळशिरस जि.सोलापुर, पुरूषोत्तम हणुमंत जाधव वय 32 रा.मळोली ता.माळशिरस यांना अटक केली. पळुन गेलेल्या जेसीबी कोणाचे मालकीचा आहे त्यावर चालक कोण होते याबाबत त्यांचेकडे माहीती घेतली असता त्यांनी सदरचा जेसीबी पिटु उर्फ भगवान पाटील रा.खवळे यांचा असल्याचे सांगीतले.
सदर ठिकाणावरून मिळुन आलेले तीन ट्रॅक्टर 1) 2,52,000/- वाळुसह एक तांबडया रंगाचा स्वराज्य 855 एफई कंपनीचा त्याचा रजि नं एम एच 45 -3591 असा खाडाखोड केलेला त्यावर राजनंदीनी असे लिहलेला व त्यास एम एच 45 ए 6017 ही डंम्पींग ट्राॅली असुन त्यात 01 ब्रास 2,000/-किमतीवी वाळु, 02) 2,52,000/- वाळुसह एक तांबडया रंगाचा महिंन्द्रा 575 डी आय माॅडेल कंपनीचा ट्रॅक्टर हेड त्याचा रजि नं एम एच 45 एफ पुढे खाडाखोेड केलेला नंबरचा त्यास बिगर नंबरची ट्राॅली त्यावर शेतकरी संघटना चांदापुर व त्यात 2,000/- किमतीची 01 ब्रास वाळु असलेली 03) 2,52,000/- वाळुसह एक महिंन्द्रा अर्जुन कंपनीचा तांबडया रंगाचा त्यास एम एच 45 ई व पुढे नंबर खोडलेली ट्राॅली त्यामध्ये 01 ब्रास वाळु 2,000/- रू किमतीची वाळु 04) 10,00,000/- रूपये किमतीचा एक निळसर पारव्या रंगाचा टिपर समोर सरकार असा लिहलेला त्याचा रजि नं एम एच 14 डी एम 0093 असा असलेला त्याची अंदाजे किमत, 05) 3,00,000/- रू किमतीची एक पांढरे रंगाची जीप तिचेवर बी वाय एच 5399 असा क्रमांक लिहलेली समोर काचेवर मातोश्री लिहलेली तसेच बाॅनेट युएसए डीएक्स 87402 असे लिहलेली 06) 35,000/- एक पॅषन प्रो कंपनीची एम एच 42 ए के 4243 मागील मडगार्ड वर पाटील असे लिहलेली 07) 35,000/- एक मोटार सायकल पॅषन प्रो काळे रंगाची एम एच 45 बी 6085 असा रजि नंबर असलेली 08) 50,000/- एक लाल रंगाची पल्सर मोटार सायकल एम एच 45 क्यु 5689 खोपडीवर 07 सुर्या असे लिहलेली, 09)15,00,000/- एक पिवळया रंगाचा जेसीबी बिगर रजि नंबरचा त्याचे समोरील काचेवर भाउ असे लिहलेली अषी एकुण 09 वाहने एकुण किंमत वाळुसह 36,76,000/- रूपये किमतीची वाहने वाळु ताब्यात घेवुन वरील इसमासह त्यांना पुढील कारवाई करीता पोलीस ठाणेत आणले आहे.
ही कारवाई आज दि.26/05/2017 रोजी सायंकाळी 17ः00 वाजणेचे सुमारास झाली. मौजे पिराची कुरोली ता. पंढरपुर गावचे शिवारात भिमा नदीचे पात्रात सध्या वाळु उत्खननचा ठेका नसताना वरील आरोपी व त्यांचे सोबतचे ईतर अनोळखी 08 ते 10 साथीदार यांनी बेकायदेशिररित्या जेसीबी चे साहायाने वाळु उत्खनन करून पर्यावरणाचा -हास होईल असे कृत्य करून ते वरील ट्रॅक्टर व टिपर मध्ये भरून चोरून स्वतःचे फायदयाकरीता घेवुन जात असताना पोलीस पथकास पाहुन वरील ताब्यात घेतलेल्या दोन आरोपीचे साथीदार आपले जेसीबी ,मोटार सायकली,जीप ,टिपर, ट्रॅक्टर भिमा नदीचे पात्रात पळुन गेलेले आहेत. म्हणुन माझी ताब्यात घेतलेले वरील दोन इसम व पळुन गेलेले ताब्यात घेतलेले वाहनाषी संबंधित असलेले 08 ते 10 अनोळखी साथीदार यांचे विरूध्द सरकार तर्फे भा द वि 379,34 पर्यावरण कायदा कलम 9, 15 प्रमाणे पोकाॅ/208 राउत यांनी फिर्याद दिलेवरून गुन्हा नोंद झालेला आहे.





