👁 14 Views

पत्रकारांसाठी प्रशिक्षण संस्था स्थापणार ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी

काळ झपाट्याने बदलत आहे. त्या बदलत्या ट्रेंडप्रमाणेच पत्रकारांनी बदलले पाहिजे. त्यामुळेच पत्रकारांना ट्रेनिंग देणारे इंस्टिट्यूट निर्माण करण्याचा आमचा विचार आहे. त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना ट्रेनिंग इंस्टिट्यूटबाबत डिसेंबरपर्यंत प्रस्ताव देणार असल्याची माहिती अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांनी दिली. ते दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला. 
    पुढे बोलताना जोशी म्हणाले, आजच्या घडीला महापालिका बीट पाहणाऱ्या पत्रकाराला टीडीआर, एफएसआय याची माहिती नसते. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील पत्रकारांना ट्रेनिंग देणे गरजेचे आहे. ट्रेनिंग इंस्टिट्यूटबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना सुचवले होते. त्याबाबत ते सकारात्मकही असल्याचेही त्यांनी सांगितले. 
       दैनिक ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनी यावेळी सोलापुरातील पत्रकारांच्या घराच्या प्रश्नाबाबत त्यांना छेडले. अनेक वर्षापासून सोलापुरातील पत्रकारांच्या घराचा पश्न प्रलंबित आहे. अनेक मुख्यमंत्री येऊन गेले मात्र केवळ आश्वासन मिळाले आहे. यापुढे यदु जोशींनी आम्हाला घरे मिळावेत यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंतीही लोकमत’चे राजा माने यांनी केली.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ‘सकाळ’चे प्रमोद बोडके यांनी केले. 



                        सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *