👁 10 Views

लिव ईन रिलेशनशीप- भाग पाच

लिव ईन रिलेशनशीप- भाग पाच 

क्रमशः…..

लिव ईन ( भाग पाच )
व्हिलचेअर वर ऐक पांढरी फटक पडलेली स्त्री गावुनवर बसली होती ….मान पडलेले होती तोंड उघड पडुन लाळ गळत होती गावुनवर ….तिच्याच खांद्यावर ठेवलेल्या रुमालान जोशींन तिच तोंड पुसल …..
आमच कुटुंब …,
I m sorry जोशी ….for what ???? सर…. प्रारब्ध्द दुसर काय ???आपली चुक …म्हणजे ?????सर पहिल बाळ गेल माझ जन्मताच …..खुप कॉप्लिकेशन्स झाली होती त्यावेळेला ….परत बाळाचा प्रयत्न करु नका सांगितलन डॉक्टरन …,ही गोळ्या घ्यायची ..त्यावेळी ….मुद्दाम चुकवलन गोळ्या ….तीला बाळ हवच होत …फसवलन मला ….मिसकॕरेज झाल ….आणि ….हे बाळ पदरात आल ….वात गेला शरीरात ….सगळे डॉक्टर झाले हकिम झाले …फरक पडला नाही ….खुप सुंदर होती त्यावेळी ….नशीबात नव्हत ते मागायला गेली …दैवाला फसवायला गेली ..,आणि हे अस झाल ……हा बघा फोटो ..डोहाळेजेवणाचा हातात धन्युष्यबाण कमरेला पोटातल्या सात महिन्याच्या बाळाला वेढा जसा तसा फुलांचा पट्टा …डोक्यावर फुलांचा मुकुट ….घालुन चंद्रकोरीवर बसलेल्या जोशी वहिनी खुपच सुंदर दिसत होत्या …..त्यांच्या सौंदर्याची आठवण त्यांच्या गर्भारपणातच का कैद करुन ठेवली जोशींनी ???घरी ऐक बाई आहे विधवा आमच्याच नात्यातली आहे तीला ठेवलय ….सगळ करते ती …हिच …तीचीही दोनवेळची जेवणाची सोय होते …
चला येतो सर …..उशिर झाला ….
जोशींनी परत तोंड पुसल …व्हिलचेअर उलटी फिरवुन ते चालु लागले ….
मुलाची आस धरणार्या स्त्रीला हि शिक्षा ….काय चुकल तीच ….
म्हणुन मी समोर पाहिले ….सुर्यनारायणाचा रथ चौफेर उधळत येत होता …
आणि माझ्या डोक्यातुन जोशीवहिनी जात नव्हत्या …
.

उम्या

क्रमशः…..


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *