👁 6 Views

पंढरपूर सिंहगड संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली भारतीय वायुसेनेतील करियरची माहिती

पंढरपूर: प्रतिनिधी 

सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणकीय प्रणाली भारतीय वायुसेनेकडे आहेत. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी अशा अनेक आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय वायुसेनेत आहेत. 


अशा या वायुसेनेत तरूणांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याबद्दल भारतीय वायु सेनेकडून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज मध्ये सोमवार दिनांक ६ मार्च रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.


  या कार्यशाळेचे उद्घाटन विंग कमांडर संगीता पौलराज, फ्लाइट लेफ्टनंट दया एस. अगरवाल, फ्लाइट ऑफिसर अंकित भट, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. समीर कटेकर आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यादरम्यान सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कडून उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयातील उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विंग कमांडर संगीता पौलराज म्हणाल्या, भारतीय हवाई दलात फ्लाइंग, टेक्निकल किंवा ग्राउंड ड्युटी शाखेत भरती झाल्यावर यशस्वी करिअर होऊ शकते. दरवर्षी, विद्यार्थ्यांना एअर फोर्स कॉमन अँडमिशन टेस्टसाठी अर्ज करण्यास सांगितले जाते. भारतीय हवाई दल प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित शाखेत प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना नियुक्त केले जाते.


लेखी परीक्षेव्यतिरिक्त, प्रवेश प्रक्रियेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी, गट चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असतो. या परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच निवड अंतिम घोषित केली जाते. भारतीय वायुसेनेत सामील होणे सोपे नाही, परंतु जर तुम्ही त्यातूनच करिअर करण्याचा निर्धार केलात तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हवाई दलात सामील होण्यापूर्वी, तुम्हाला सर्व आवश्यक ज्ञान असणे आवश्यक आहे. वायुसेनेची परीक्षा देण्यासाठी कोणते वय असावे, कोणते विषय दिले जावेत, कोणत्या परीक्षेसाठी कोणती उंची असावी, भरती प्रक्रिया कशी आहे आदी माहिती असणे आवश्यक असल्याचे मत विंग कमांडर संगीता पौलराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले.

    यावेळी भारतीय वायु सेनेतील कर्मचाऱ्यांच्या वाल्वो वाहन मधुन भारतीय वायुसेनेतील विविध प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यशाळेस पंढरपूर शहर व परिसरातील पालक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिशा होनमाने व अलिना इनामदार यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. समीर कटेकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अभिजित सवासे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *