CBSE 10th class result 2017 : सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दुपारपर्यंत शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील.
सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेच्या पाच विभागांचा निकाल दुपारी बारा वाजता जाहीर झाला. दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, त्रिवेंद्रम आणि देहरादून या विभागांचा निकाल जाहीर झाला. दिल्ली विभागाचा निकाल ८८.३७ टक्के इतका निकाल लागल्याची माहिती मिळत आहे. मात्र, देशातील उर्वरित विभागाचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काही वेळापूर्वीच जाहीर झाला. cbseresults.nic.in. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहायला मिळतील. ९ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेला देशभरातून १६.५ लाख विद्यार्थी बसले होते.
सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज दुपारपर्यंत शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. www.results.nic.in , www.cbseresults.nic.in , www.cbse.nic.in या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील. यापूर्वी २८ मे रोजी सीबीएसकडून बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून दहावीच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या निकालाची प्रतिक्षा लागली होती. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल कशाप्रकारे पाहावेत, याची सविस्तर माहिती सीबीएसईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच ५२००१ (MTNL), ५७७६६ (BSNL), ५८००००२ (Aircel), ५५४५६०६८ (Idea), ५४३२१, ५१३२१ आणि ५३३३३०० (Tata Teleservices), ५४३२१२०२ (Airtel), आणि ९२१२३५७१२३ (National Informatics Centre) या क्रमांकावर मेसेज केल्यास आपला निकाल उपलब्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला होता. यामध्ये अवघड प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याच्या निर्णयाला मान्यता दिली होती.
सीबीएसईचा निकाल संकेतस्थळावर कशाप्रकारे पाहाल?
* बातमीमध्ये नमूद केलेल्या संकेतस्थळावर जा. ( www.results.nic.in , www.cbseresults.nic.in , www.cbse.nic.in )
* याठिकाणी विचारलेले तपशील भरा. ( रोल नं., जन्मतारीख, शाळा क्रमांक आणि केंद्र क्रमांक)
माहिती भरून झाल्यानंतर सबमीट बटणावर क्लिक करा.
* रिझल्ट मिळवा.
* प्रिंटआऊट घ्या.
* बातमीमध्ये नमूद केलेल्या संकेतस्थळावर जा. ( www.results.nic.in , www.cbseresults.nic.in , www.cbse.nic.in )
* याठिकाणी विचारलेले तपशील भरा. ( रोल नं., जन्मतारीख, शाळा क्रमांक आणि केंद्र क्रमांक)
माहिती भरून झाल्यानंतर सबमीट बटणावर क्लिक करा.
* रिझल्ट मिळवा.
* प्रिंटआऊट घ्या.





